चौक-तिनघर येथील ऑटोटेक सेंटरमध्ये आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. लागलेल्या आगीत जीवित हानी जरी झाली नसली तरी मात्र सेंटरचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चौक टिंगर येथे ऑटोमॅटिक सेंटरला अचानक सकाळी पहाटेच्या दरम्यान आग लागल्याची माहिती प्राप्त होताच आग आटोक्यात आणण्यासाठी एमआयडीसी रसायनी, रिलायन्स फायर ब्रिगेड, रसायनी फायर ब्रिगेड आणि खोपोली नगरपरिषद यांची अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही, मात्र सेंटरचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळी पोलीस आणि फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.