प्रादेशिक परिवहन कार्यालय,पनवेल आणि मोटार ड्रायव्हिंग स्वूल मालक संघटना, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रबोधन कार्यशाळा नुकतीच खारघर मधील ग्लोबल इंटरनॅशनल स्वूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय मधील मोटार वाहन निरीक्षक योगेश शितोळे आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रिती पवार यांनी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्व, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित ड्रायव्हिंग याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कल्याणी म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हा भाजपा सचिव ब्रिजेश पटेल, खारघर शहर भाजपा उपाध्यक्ष किरण पाटील, माजी नगरसेवक प्रवीण पाटील, ‘ग्लोबल इंटरनॅशनल स्वूल अँड ज्युनिअर कॉलेज’चे अध्यक्ष सुरज म्हात्रे, प्राचार्य दीपकोर सैनी, रेवी शेलदार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत सुत्रसंचालन सपना पाटील यांनी केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी खारघर मधील मोटार ड्रायव्हिंग स्वूल संचालक दिपा भैरट, गणेश सांगळे, सागर भद्रा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कार्यशाळेत आरोग्य तपासणी शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.