कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रोहा तालुक्यातील नामवंत अशा श्रीसंत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा ६७ वे अखंड हरिनाम सप्ताह नडवली येथे ३० मार्च ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत अनेक साधू संत यांच्या प्रबोधन कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून संपन्न होत आहे.
कोकण वाशीयांचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वै हभप अलिबागकर महाराज,गुरुवर्य गोपाल महाराज वाजे,धोंडूबाबा कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तसेच परमपूज्य पांडुरंग शात्री आठवले (दादा) आणि सद्गुरू मामासाहेब दांडेकर गुरुवर्य बाबामहाराज सातारकर यांचे थोर प्रबोधन लाभलेल्या खांब पंचक्रोशीत हभप नारायण दादा वाजे हभप दत्तू महाराज कोल्हटकर (पंढरपूर) यांच्या कुशल मार्गदर्शन तसेच हभप रायगड भूषण मारुती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाने हा अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण श्री क्षेत्र नडवली या ठिकाणी मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न होत असून याची जय्यत तयारी नडवली ग्रामस्थ युवक मंडळ महिला वर्ग तसेच मुंबईकर मंडळी करीत आहेत,
दिनांक ३० मार्च रोजी या सप्ताहाची सुरुवात कलश पूजन गुरुवर्य स्वा.सु.नि.अलिबागकर महाराज, गोपालबाबा वाजे, धोंडू बाबा कोल्हटकर, यांचे आदीस्थान पूजन जय जय राम कृष्ण हरी मंत्र जप विणा पहारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीसंत तुकाराम महाराज गाथेवरील भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन भजन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून विविध प्रकारचे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन कारांचे कीर्तनरुपी सेवा व प्रवचन रुपी सेवा या प्रसंगी भाविकाना लाभणार आहे.
.
वारकरी संप्रदयाची परंपरा लाभलेल्या खांब पंचकोशितील सप्ताहाची सुरुवात धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमांनी व जय जय राम कृष्ण हरि मंत्राच्या जयघोषात नडवली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभाग्रहाच्या प्रांगणात शनिवार ३० मार्च ते ६ एप्रिल २०२४ या दरम्यान संपन्न होत असलेल्या अखंड नाम जप यज्ञ हरिनाम सप्ताह प्रसंगी दररोज सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण ११: ३० ते दु १ वा श्री संत जगतगुरु तुकाराम महाराज गाथेवरील भजन तद्नंतर भोजन सायं ५ ते ६ प्रवचन ६ ते ७ हरिपाठ तद्नंतर अन्नप्रसाद रात्रौ ९:३० ते ११: ३० सुश्राव्य कीर्तन सेवा असे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.३० मार्च रोजी फाल्गुन वद्य पंचमी सालाहाद प्रमाणे सुरुवात होत असून प्रसंगी कार्यक्रमाच्या पाहिल्या दिवसाची सुरुवात हभप नारायण दादा वाजे रात्रौ हभप नारायण दादा वाजे (पंढरपूर )यांच्या प्रवचन व कीर्तन सेवेने होणार आहे.तर विणा जागर पहारा नडवली ग्रामस्थ यांचा रहाणार आहे.३१ मार्च रोजी एकनाथीषष्ठी निमित्ताने पुष्प वृष्टी कीर्तन सकाळी १० ते १२ हभप मदन कोल्हटकर (तळवली तर्फे अष्टमी) प्रवचन हभप विजयानंद तेलंगे (तळवली तर्फे दिवाळी) व हभप रामदास टोंगले (खांब ) यांचे कीर्तन सेवा तर विणा जागर पहारा तळवली तर्फे अष्टमी ग्रामस्थ, १ एप्रिल रोजी प्रवचन हभप भूषण महाराज वरखले (नडवली) हभप रायगड भूषण रामदास पाटील (खानाव ) यांची कीर्तन सेवा विणा जागर पहारा चिल्हे ग्रामस्थ,२ एप्रिल रोजी प्रवचन हभप भूषण महाडीक (चिल्हे ) हभप तुकाराम शिंदे (देवाची आळंदी ) यांची कीर्तन सेवा वीणा पहारा धानकान्हे ग्रामस्थ ,३ एप्रिल रोजी प्रवचन रायगड भूषण बाळाराम महाराज शेळके (धाटाव ) हभप विनायक कांबेकर ( कांबे खालापूर )यांची कीर्तन सेवा वीणा जागर पहारा खांब ग्रामस्थ, ४ एप्रिल रोजी प्रवचन हभप ज्ञानेश्वर महाराज लोखंडे (चिल्हे ) हभप सुधाकर महाराज वाघ पैठणकर, यांची कीर्तन सेवा वीणा जागर पहारा तळवली आणि चिल्हे ग्रामस्थ, ५ एप्रील रोजी प्रवचन हभप महेश महाराज मळेकर ( शिरूर बीड ) तसेच हभप महंत विवेकानंद शास्त्री (सिद्धेश्वर संस्थान शिरूर बीड ) यांचे कीर्तन सेवा वीणा जागर पहारा धानकान्हे आणि खांब ग्रामस्थ,६ एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता समारोप म्हणजे काल्याचे कीर्तन सेवेतून होणार असून कोकण प्रांत अध्यक्ष तथा या पंचक्रोशीचे वैभव रायगड भूषण मारुती महाराज कोल्हटकर यांचे होणार असून महाप्रसादी आणि तद्नंतर सद्गुरुंच्या पालखीची मिरवणूक म्हणजे छबिनाने करण्यात येणार आहे,
गेली ६७ वर्ष अविरतपणे चालत असलेला या सप्ताहाचे मूळ मार्गदर्शक प्रेरणा तथा श्रद्धास्थान वै नारायण माने, मोरेश्वर मामा मांगुलकर, नारायण दादा लोखंडे, सदाशिव वरखले, काशिराम गोसावी,यांच्या संकल्पनेतून चालत आलेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे.सदर या सोहळ्यासाठी पंचक्रोशीचे अध्यक्ष ह.भ.प. कृष्णा सिताराम जाधव,उपाध्यक्ष ह.भ.प. प्रकाश कृष्णा थिटे, सेक्रेटरी ह.भ.प. सहादेव धोंडू महाडिक, खजिनदार रविंद्र रामचंद्र मरवडे, पंच ह.भ.प. नथु हरि जाधव,ह.भ.प. ज्ञानेश्वर दगडू लोखंडे,ह.भ.प. गणपत भागोजी खामकर,ह.भ.प. सुदाम मारुती कचरे,ह.भ.प. राम यशवंत लोखंडे,ह.भ.प. रघुनाथ काशिनाथ कोस्तेकर,चंद्रकांत मारुती भोसले,ह.भ.प. महादेव गणपत माहीत, सल्लागार रामचंद्र सिताराम चितळकर, व श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी व नडवली ग्रामस्थ, महीला, आदि युवक मंडळ व मुंबईकर मंडळ यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत,.