कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीची वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या पंचक्रोशीतील यजमान श्री क्षेत्र नडवली येथे गेली सात दिवस चालत असलेला हा अखंड हरीनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण सोहळा जय जय राम कृष्ण हरी मंत्र जप कीर्तन महोत्सव नडवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदरच्या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांचे अलौकिक मार्गदर्शनातून मंत्रमुग्ध होऊन याचा भक्तिमय वातावरणात भक्तगणांनी आनंद लुटला.
रोहा तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचा वारसा जतन करत असलेल्या खांब पंचक्रोशीचा ६७ वे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवारी ६ एप्रिल रोजी खांब पंचक्रोशीचे वैभव तथा आधिस्थान रायगड भूषण हभप मारुती महाराज कोल्हटकर यांच्या काल्याच्या किर्तनाने तसेच सद्गुरू वै.स्वा.सु.नि.गुरुवर्य अलिबाकर महाराज यांच्या चरण पादुका तसेच श्रींच्या पालखी सोहल्याने मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
सद्गुरू गुरुवर्य अलिबागकर महाराज, गुरूवर्य गोपाळ महाराज वाजे, गुरूवर्य धोंडू महाराज कोल्हटकर, यांच्या कृपाशीर्वादाने हभप नारायण दादा वाजे, हभप दत्तू महाराज कोल्हटकर, यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड भूषण तथा खांब पंचक्रोशीचे आधिस्थान हभप मारूती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली, श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी, नडवली ग्रामस्थ यांच्या वतीने गेली सात दिवस ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण भजन संपुर्ण हरिपाठ प्रवचन कीर्तन हरी जागर अशा धार्मिक कार्यक्रम सप्ताह महोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने या ठिकाणी साजरा झाला.
खांब पंचक्रोशीतील श्री क्षेत्र नडवली येथे मोठ्या आनंदायी वातावरणात ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याची सांगता काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.तर गेली सात दिवस त्यानिमित्ताने ग्रामस्थ महीला युवक मंडळ यांनी आगळ्या वेगळ्या प्रकारचे सजावटीतून देखावे सादर केले संपुर्ण गाव कणा रांगोळ्या फुलांनी सजविण्यात आले तर मंदिर परिसर तसेच छत्रपति शिवाजी महाराजांचे स्मारक रोषणाईने उजळून निघाले होते. तर दरदिवशी किर्तन रूपी सेवेत कीर्तनकार महाराजांसमवेत चक्क विविध संतांची वेशभूषा परिधान करून किर्तनकार यांचे जल्लोषात स्वागत करत ऐतिहासिक शिवकालीन खेळातील लाटी काठी दांड पट्टा लेझिम पथक खाळु बाजा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आले.तर सात दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
जय जय राम कृष्ण हरी मंत्र जप यज्ञ नाम ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, संत तुकाराम महाराज यांच्या गाथेवरील भजन वीणा जागर पारा संपुर्ण हरिपाठ तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हभप भरत महाराज वाजे पंढरपूर,मदन महाराज कोल्हटकर,रामदास महाराज टोंगले खांब, रामदास महाराज पाटील खानाव, तुकाराम महाराज शिंदे देवाची आळंदी, सचिदानंद कांबेकर कांबे खालापूर, सुधाकर महाराज पैठणकर,महंत विवेकानंद शास्त्री सिध्देश्वर संस्थान बिड,रायगड भूषण मारुती महाराज कोल्हटकर,अशा कीर्तन सम्राट कीर्तन कार महाराज यांच्या सेवेतून भाविकांना उत्तम मार्गदर्शन लाभले.तसेच पारायणाला नडवली ग्रामस्थ मुंबईकर तसेच खांब पंचक्रोशीतील खांब, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे,पंचक्रोशी व आदी भागातील तसेच तालुक्यांतील वारकरी संप्रदाय मंडळी भाविक भक्त उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा आनंद लुटत याचा लाभ घेतला तसेच नडवली ग्रामस्थ यांनी हा धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेली सात दिवस अथक परिश्रम घेतले तसेच प्रवचनकार कीर्तनकार महाराज त्याच बरोबर या सप्ताह प्रसंगी वारकरी मंडळी, सामजिक, राजकिय,शैक्षणिक,सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सदिच्छा भेट दिली यांचे ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशी यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.