खरोशी शाळेचे विविध स्पर्धेत घवघवीत यश; १४ बक्षिकांसह अव्वल स्थान

Kharoshi School Pen
पेण :
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती पेण यांच्या संयुक्त विद्यमाने खरोशी-केंद्रातर्फे आयोजित क्रीडा व व्यक्तीमत्त्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुयश मिळवून १४ बक्षीसे जिंकून केंद्रात अव्वल स्थान पटकावला आहे.
प्रभाकर पाटील फार्म हाऊस वळक येथे केंद्रप्रमुख प्रफुल्ल सुखचैन यांच्या उत्तम नियोजनात सर्व खरोशी केंद्रातील शिक्षकांच्या सहकार्याने सदर स्पर्धेत बेचकी प्रकार, लंगडी दोरी उडी, लगोरी, पारंपारिक नृत्य व समूहगीत गायन शिल्पकला पथनाट्य यांचा समावेश होता. यामध्ये खरोशी शाळेने बेचकीने नेम धरणे शिल्पकला समूहगान पारंपारिक नृत्य, लगोरी, पथनाट्य शून्य कचरा व्यवस्थापन या विविध स्पर्धा मध्ये लहान व मोठ्या गटात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले.
प्रारंभी क्रीडा ज्योत पेटवून व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पमाला घालून स्पर्धेचे दीप प्रज्वलन रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. बेलवडे सरपंच ग्रामपंचायत सदस्या, वळक सरपंच, बळवली सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य व पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यास केंद्र‌प्रमुख व केंद्रातील शिक्षकांनी सहकार्य केले.
खरोशी शाळेने आतापर्यंत आदर्श उत्कृष्ट शाळा प्रथम क्रमांक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरीय व्दितीय क्रमांक , आदर्श शाळा पुरस्कार प्राप्तझाले असून शाळेची उत्तम प्रगती करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर म्हात्रे, सहकारी शिक्षक सदानंद पाटील,  अदिती चेऊलकर, उदय म्हात्रे , राजेंद्र शिंदे, ज्योती एकशिंगे पूजा तोगडे यांनी मार्गदर्शक व व्यवस्थापक यांची भूमिका बजावली.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपत पाटील उपाध्यक्षा प्रिती सोपान पाटील व सदस्य सरपंच सौ. रुपाली पाटील उपसरपंच प्रणाली घरत यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading