पंतप्रधान महोदयांनी सन २०२५ ला भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवलेले आहे जे की शाश्वत विकास ध्येयाच्या अपेक्षित कालावधीपेक्षा ५ वर्ष अगोदर आहे. याकरीता मा.पंतप्रधान महोदयांनी दि. २४ मार्च २०२३ रोजी क्षयरोग मुक्त पंचायत हा अभिनव उपक्रम सुरु केला असून याद्वारे पंचायत राज संस्थांना सक्षम करुन क्षयरोगाशी निगडीत समस्यांचे निराकरण करुन क्षयरोग दुरीकरणासाठी ग्रामपंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करुन त्यांच्या योगदानाचे जाहीर कौतुक करून ग्रामीण भागातील समाज क्षयरोग मुक्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन जाधव यांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत गावपातळीवरील आरोग्य उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने क्षयरोग दुरीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. तसेच दि.०८ जुलै २०२२ रोजी पंचायतराज मंत्रालय, भारत सरकारने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार सोबत टिबी मुक्त पंचायतसाठी सामंजस्य करार केलेला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये क्षयरोग मुक्त पंचायत हा कार्यक्रम सन २०२३ पासून राबविला जात आहे. सन २०२३ मध्ये रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर ९० क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतीना महात्मा गांधीजींचा पुतळा व जिल्हाधिकारी, रायगड यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यांत आले. सन २०२४ या वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
सन २०२४ या वर्षामध्ये जिल्ह्यातील ५० टक्के ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग विभाग प्रयत्नशील आहे. हा उपक्रम यशस्वी होण्याकरीता गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्ग कर्मचारी इ. सर्व केडरना मार्गदर्शन करून त्यांचा सहभाग घेण्यात येत आहे. याकरीता जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर विविध कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच रायगड मेडीकल असोसिएशन ही या उपक्रमाकरीता मदत करत आहे.
क्षयरोग निदानाकरीता रायगड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये नॅट Molecular Diagnostic Facility सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ६२ सुक्ष्मदर्शी तपासणी केंद्रामार्फतही क्षयरुग्ण तपासणी करण्यात येत आहे.तसेच एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल, कामोठे, ता. पनवेल येथे फुप्फुसेत्तर (Extra Pulmonary) रुग्णांकरीता निदान सुविधा व Multi Drugs Resistant रुग्णांकरीता सर्व सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यांत आल्या आहेत. क्षयरुग्णांकरीता सर्व निदान सुविधा व औषधोपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत दिला जातो.
जिल्ह्यातीलसर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचीही राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात मदत घेतली जात आहे. विविध औद्योगिक कंपन्यांनीही त्यांच्या CSR फंडामधून मोठे योगदान दिलेले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.