पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या पुढाकाराने सात कलमी योजनेअंतर्गत संपूर्ण सुविधायुक्त आणि नागरिकमैत्री स्वागत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्याचे वातावरण प्रसन्न, आल्हाददायक आणि जनतेसाठी अधिक सुलभ झाले आहे.
स्वागत कक्षातील सुविधा:
1. स्वागत गीत: पोलीस ठाण्यात आलेल्या अभ्यागतांचे स्वागत गीतेच्या माध्यमातून स्वागत करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
2. बैठकीची सोय: अभ्यागतांना थांबण्यासाठी सुसज्ज आणि आरामदायक बैठक व्यवस्था केली आहे.
3. पर्यावरण पूरक स्वागत: अभ्यागतांचे स्वागत करण्यासाठी पर्यावरणसंवर्धनाची काळजी घेऊन फुलांचे बुके ठेवण्यात आले आहेत.
4. वर्तमानपत्र वाचन व्यवस्था: अभ्यागतांना वेळ घालवण्यासाठी टीपॉयवर वर्तमानपत्रांची सोय केली आहे.
5. पिण्याचे शुद्ध पाणी: ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.
6. टीव्हीवरील माहितीपूर्ण सादरीकरण: रायगड पोलीसांची कामगिरी दर्शवणारे स्लाईड्स असलेला टीव्ही लावण्यात आला आहे, ज्याद्वारे पोलीस विभागाच्या कामाबद्दलची माहिती दिली जाते.
7. माहिती फलक व बॅनर: अभ्यागतांना कायद्याची माहिती देणारे बॅनर व दिशादर्शक बोर्ड ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
8. नोंद वही: पोलीस ठाण्यास भेट देणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र नोंद वही ठेवली आहे.
9. सौजन्यपूर्ण वर्तन: ठाण्यातील अंमलदारांना सौजन्यपूर्ण वर्तनाबाबत मार्गदर्शन केले आहे.
10. तक्रारींवर त्वरित प्रतिसाद: PSI/API दर्जाच्या देखरेख अधिकार्यांची नेमणूक करून नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला जातो.
11. ठाणेदार कक्षाचे सुशोभीकरण: ठाणेदार कक्ष अधिक आकर्षक व व्यवस्थित बनवून एकसमान खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत.
12. इतर कक्षांचे आधुनिकीकरण: लेखनिक कक्ष, गुप्त कक्ष, बिनतारी संदेश कक्ष यांसारख्या सर्व कक्षांमध्ये एकसमान खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे.
13. स्वच्छतागृहांची सुधारणा: पोलीस ठाण्यातील सर्व स्वच्छतागृह स्वच्छ व आधुनिक बनवण्यात आली आहेत.
14. परिसराचे सौंदर्यीकरण: पोलीस ठाण्याचा परिसर सुशोभित व हरित करण्यात आला आहे.
15. आल्हाददायक वातावरण: वरील सर्व सुधारणा पूर्ण केल्यामुळे पोलीस ठाण्याचे वातावरण प्रसन्न व नागरिकांसाठी अनुकूल बनले आहे.
या उपक्रमामुळे वडखळ पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना पोलीस सेवेचा सकारात्मक अनुभव मिळत असून, ठाण्याचे कामकाज अधिक पारदर्शक व नागरिकाभिमुख झाले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.