अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यामंदिर शाळेला सोलर सिस्टीम भेट देऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमाचे श्रेय शाळेचे चेअरमन बाळू शेठ पाटील, ग्राम पंचायत सदस्य संदेश बैकर, उपसरपंच भूपेंद्र पाटील आणि SOLARGLIDE SYSTEMS चे दूरदर्शी संस्थापक निर्वाण दिडवानिया यांना जाते.
निर्वाण दिडवानिया हे केवळ नाविन्यपूर्ण सोलर सोल्यूशन्सची स्थापना करत नसून ग्रामीण भारतात नवीकरणीय ऊर्जेच्या संभाव्यतेचा वापर करून स्थानीक समुदायांना सक्षम बनवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी शहाबाज येथील माध्यमिक विद्यामंदिर आणि पेडांबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलर सिस्टीम बसवून शाश्वत ऊर्जा उपायांद्वारे मोठा प्रभाव निर्माण केला आहे.
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेचे महत्त्व शिकवून, त्यांना भविष्यातील करिअर म्हणून याचा विचार करण्यासाठी प्रोत्साहित केले. सोलर ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे अधिक ऊर्जा निर्माण करणे आणि स्थानिकांना त्याचे प्रशिक्षण देणे यावर त्यांनी भर दिला आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील आणि व्यवस्थापन समिती सदस्य जगदीश पाटील यांनी निर्वाण दिडवानिया यांचे आभार मानले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.