कोळी समाज इमारतीजवळ आढळला मृतदेह

Body
पनवेल :
पनवेल शहरातील कोळी समाज इमारतीजवळ मोकळ्या जागेत एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, बांधा सडपातळ, डोक्याचे केस बारीक व पांढरे, उंची अंदाजे 5 फुट 6 इंच असून, अंगात तपकिरी रंगाचा हाफ बाह्याचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे.
या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading