कोलाड ( श्याम लोखंडे ) : रायगड जिल्ह्यात शैक्षिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीचे कै. द. ग. तटकरे कोलाड हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोलाडचे प्राचार्य शिरीष येरुणकर हे सोमवार दि. ३१ जुलै २०२३ रोजी सेवा निवृत्त झाले असुन त्यांच्या विशेष कार्याचा गौरव सोहळा व निरोप समारंभाससाठी त्यांचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वारकरी संप्रदाय, अनेक क्षेत्रातील मान्यवर तसेच कोलाड हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
वयोमानानुसार सेवानिवृत्ती ठरली असली तरी शिरीष येरुणकर यांची सेवानिवृत्ती वेगळी आहे. कारण शिरीष येरुणकर यांचे शिक्षण ज्या शाळेत झाले त्याच शाळेत ते शिक्षक सेवेत रुजू झाले. त्यांची ओळख ही अतिशय शिस्तप्रिय शिक्षक असून त्यांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले. व त्यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर छोट्या शाळेचे मोठया वटवृक्षात रूपांतर केले त्यामुळे ते याच हायस्कूलमध्ये प्राचार्य झाले व याच हायस्कूलमध्ये सेवानिवृत्त झाले.
प्राचार्य शिरीष येरुणकर यांच्या विषयी बोलायचे म्हणजे ते भूगोल विषय शिकवायचे त्यांची भूगोल शिकवण्याची पद्धत इतकी सोपी होती कि सर्व विद्यार्थी मग्न असायचे जणू भूगोल शिकवतांना काल्पनिक दुनियेत नेऊन जणू ब्रमांड फिरून आण्याचे या त्यांच्या शिकवण्याचा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची प्रश्न उत्तरे तोंड पाठ व्हायची. याचबरोबर आई-बाबांचे नाव कमवा ते तुमच्या साठी आयुषभर झटतात असा अनमोल मार्गदर्शन ही विद्यार्थ्यांना करीत असत. तसेच बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थी यांच्या साठी अनेक वेळा मद्दतीचा हात पुढे केला. यामुळे त्यांचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, राजकीय सामाजिक शैक्षणिक व वारकरी संप्रदाय क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित राहून शिरीष येरुणकर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.