मंगळवार दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ८.३० वाजता कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड गावाच्या हद्दीत एक दुर्दैवी अपघात घडला. पुगांव येथील रहिवासी पंढरीनाथ बबनराव देशमुख (वय ५८) यांचा मडगावहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या अप एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
ही दुर्घटना कोकण रेल्वेच्या अप लाईनवर, इलेक्ट्रिक पोल क्रमांक १०/२७ जवळ घडली. अपघातानंतर देशमुख यांना तातडीने रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एन. एन. चौधरी आणि एन. झेड. सुखदेवे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दुर्घटनेने कोलाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.