कोलाड ( श्याम लोखंडे ) :
मुंबई-गोवा हायवे वरील कोलाड आंबेवाडी बाजारपेठेत गाईच्या एका वासराला अज्ञात वाहनाने धडक दिली.आणि अपघातात वासरू जखमी झाला.याची माहिती समजताच घटनास्थळी प्राणीमित्र कुमार देशपांडे यांनी धाव घेत व आजूबाजूचे व्यापारी यांनी धाव घेत वासराला रस्त्यावरून हलवून सुरक्षित ठिकाणी त्याला उपचार करत देशपांडे यांच्या मदतीने प्राण वाचवले त्यामुळे प्राणीमित्र कुमार देशपांडे यांचे कौतुक होत आहे .
याची सविस्तर माहिती अशी कि मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड बाजारपेठेत दोन दिवसापूर्वी एका अज्ञात वाहनाने वासराला धडक दिली या अपघातात वासरू गंभीर जखमी झाला त्या वासराला प्राणी प्रेमी व आजूबाजूचे व्यापारी यांनी उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले परंतु वासराच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उभे राहता येत नव्हते.कारण त्या वासराचे पाय सुजले व त्याच्या पायात दुखापत झाली होती.हे लक्षात येताच प्रफुल्ल बेटकर, ज्योती पाडसे सिस्टर लेपरशी यांनी प्राणी मित्र कुमार देशपांडे यांना फोन करून बोलावून घेतले प्राणी मित्र देशपांडे यांनी वासराच्या पायातील पु काढून त्या जखमेवर औषध उपचार केले .त्या वासराला तीन सलानीतून उपचार केले व वासराला जिवदान दिले.
मुंबई-गोवा हायवे वरील उनाड गुरांमुळे अनेक समस्या निर्माण होत असुन केव्हा उनाड गु्रांमुळे प्रवाशी जखमी तर वाहनांमुळे गुरे जखमी होत आहेत याविषयी शांतता कमेटीच्या मिटिंग मध्ये अनेक वेळा कोलाड पोलिस ठाण्यात प्रफुल बेटकर व चंद्रकांत लोखंडे यांनी विषय मांडला होता.कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि मोहिते यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते यावर लवकर लवकर उपाययोजना करावी अशी मागणी प्राणी मित्र प्रफुल बेटकर यांच्या कडून केली जात आहे.