कोलाड नाक्यावर मुंबई गोवा महामार्गाच्या उड्डाण पुलाचं काम ठप्प; वाहतूक कोंडी अन् धुळीचं साम्राज्य, नागरिक हैराण

Kolad Naka
कोलाड (श्याम लोखंडे) :
गेली तेरा चौदा वर्षे सरकारच्या बे जबाबदार पणाच्या धोरणांमुळे तसेच ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे दिसून येत आहे. त्यात पेण ते महाड दरम्यानच्या कामाला मागील लोकसभा निवडणुकीआधी कोलाड नाक्यावरील उड्डाण पुलाच्या कामाला जोरदार सुरूवात करण्यात आली त्याच कमाची चांगली प्रगती केली माञ त्याच कामाला मागील महिन्यापासून दिरंगाई होत गेली त्यामुळे मर्गालगतचे गाव ग्रामस्थ हॉटेल, भाजी,किराणा,व्यवसायिक दुकानदार सह प्रवासी नागरीक हतबल झाले असून दिवसेंदिवस येथील नागरीकांना मार्गावरून होत असलेली वाहतूक कोंडी आणि प्रदूषित होणारी धूळ याला सामोरे जावे लागत असल्याने सर्वत्र एकच संताप व्यक्त केला जात आहे.
उड्डाण पूल आणि सर्व्हिस रोडसाठी खोद कामे सुरू केल्याने कोलाड नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी तर बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी दमछाक होत असल्याने कोलाड आंबेवाडी नाका अक्षरशः या वाहतूकोंडीमुळे तसेच धुळकोंडीत अक्षरशः गुदमरत आहे.
महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकदराची एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था पाहवयास मिळत आहे. सुरू असलेल्या सुकेळी ते तीसे दरम्याच्या कामात कोणताही टप्पा पुर्ण अवस्थेत नसताना अधिक पुढे कामांची खोद कामे जलत गतीत सुरू याचा नागरीकांना अभिमान आहे. मात्र त्यात काही ठिकाणी ही कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे एकीकडे दुःख सहन करावा लागत असल्याने सर्वत्र वाहतुकीच्या कोंडीला तर काही ठिकाणी आपघाताला सामोरे जावे लागत आहे ही परिस्थिती निर्माण झाली आहे .
काय दुःख सांगावे परी आम्ही, काही उरलेच नाही या जगी गेली तेरा चौदा वर्ष या मार्गाचा वनवास कोकणातील विशेषतः रायगडकर प्रवाशी निमूटपणे सहन करत आहेत.तर याचे दुःख सांगावे कोणाला हेच कळत नसल्याने या मार्गाची ,त्यावरील सर्व्हिस रोड गटारे नदीवरील पूल मार्गाच्या साईड पट्ट्या अधून मधून सोडलेले काँक्रीटकरण तसेच सुकेळी खिंड, खांब, पुई, तीसे तळवली, रातवड, येथील मार्गाची कामे तसेच पादचारी पुलाचे काम आजही अर्धवट अवस्थेत आहेत तसेच पुई येथील महिसदरा नदीपात्रातील पुलाचे काम वर्षना वर्ष अर्धवट अवस्थेत त्यात आता चक्क कोलाड आंबेवाडी नाक्यावरील चौकातील मार्गाच्या उड्डाण पुलाचे काम ठप्प असल्याने मेन मार्ग खोदकाम सुरू तर मागील काही बनवलेले सर्व्हिस रस्ते व गटार लाईन ची कामे देखील अर्धवट अवस्थेत असल्याने नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे त्यात मोठे धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने येथील प्रवासी नागरीक तसेच व्यवसायिक दुकानदार यांची मोठी दमछाक होत असताना दिसत असून हॉटेल व्यवसायिक व चहा वडापाव विक्रत्यांवर मोठी संक्रात वाहतुकीच्या कोंडीमुळे व धुळीच्या प्रदूषणामुळे ओढवली आहे.तर धुळीवर ठेकेदार यांच्या कडून काही पाण्याचा भडिमार केला जात आहे माञ चिखलातून प्रवास धोक्याचा होत असल्याने आपघाताची सम्यास्या दुचाकीस्वार यांच्यात ओढवली जात असल्याचे बोलले जात आहे त्यामूळे यावर लवकरात लवकर काही उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरकरणाचे काम गेली तेरा चौदा वर्षे चालू आहे तर या रखडलेल्या कामाला जबाबदार कोण रायगड सह कोकणातील पत्रकारांनी आंदोलने केली त्यात अनेक निवडणुका आल्या गेल्या जिंकल्या सत्ता हि सत्ता हि स्थापन झाली आहे.मात्र मार्गाची परिस्थिती जैसे थे तसेच या मार्गासाठी लाखो कोटी रुपयांचा निधी आला खर्च झाला तर अधिक पुढे होत आहे. त्यामुळे पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी देखील मार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे तर मार्गासाठी अनेकांचे पोटाची खळगी भरणारी शेत जमीन गेली काहींची राहती घरे व्यवसायिक दुकाने पोल्ट्री फार्म त्याच बरोबर दररोज रोजी रोटी करण्यारांची हात मजुरी देखील गेली तसेच चौपदरी रस्ता करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नागोठणे इंदापूर दरम्यान जमिनी शासनाने भू संपादित केलेल्या अल्पभूधारकशेतकऱ्यांना अद्याप त्याचा पुरेसा मोबदला देखील मिळाला नसल्याचे बोलले जाते तर तोही प्रश्न ऐरणिवर आहे.
——————————————–
मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील कै द ग तटकरे चौकातील उड्डाण पुलाचे काम ठप्प आहे. चालू कामाकरीता वाहतूक हि सर्व्हिस मार्गावरुन वळवली गेली मार्गावरून होणारी वाहतूक ही कमकुवत बनविलेल्या सर्व्हिस रोड मार्गाने होत आहे जड अवजड वाहनांची वाहतूक तसेच त्याला जोडला गेलेला रोहा मार्ग त्यामुळे भर चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे हे काम किती महिने की किती वर्ष चालत राहणार आहे याच काही आता गणित नाही तर या मार्गाला लागून बनविलेले सर्व्हिस मार्ग हे अरुंद अवस्थेत तर काही ठिकाणी मातीचा भरवा तर वरसगाव भारत पेट्रोल पंप भिरा फाटा त्याला जोडलेले गटारे आणि काही व्यवसायिक दुकाने त्यामुळे बाजारात ये जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.दिवसेंदिवस कामाची दिरंगाई त्यात कोलाड आंबेवाडी वरसगाव नाक्यावर भरमसाठ वाहतुकीमुळे प्रदूषित होत असलेल्या धुळीचे साम्राज्य त्यामुळे प्रवाशी वर्गासाठी सदरील ठेकेदाराने अथवा संबधीत खात्याकडून यावर उपाय योजना लवकरात लवकर कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे .
…डॉ.मंगेश सानप, सामजिक कार्यकर्ते- कोलाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading