कोलाड (श्याम लोखंडे) :
कोलाड आंबेवाडी नाल्यावरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात धीम्या गती आल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली असून मार्गावरील कोलाड आंबेवाडी येथील मेन द.ग.तटकरे चौकात भला मोठा खड्डा पडला आहे. सदरच्या खड्यात कोणी प्रवाश्याचा जीव गेल्यानंतर हा खड्डा बुजवला जाईल का? असा संताप प्रवाशी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन कोलाड बाजुकडून रोहा बाजूकडे जाणाऱ्या स्वागतालाच रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे तीन ते चार टूव्हीलरस्वार पडून किरकोळ जखमी झाले असल्याचे समजते मात्र सुदैवाने सर्वजण थोडक्यात बचावले परंतु कोणाचा नाहक बळी गेल्या नंतर हा खड्डा भरला जाईल का? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून आता काम करणाऱ्या ठेकेदार विरोधात व्यक्त केली जात आहे.
कोलाड बाजुकडून रोहा बाजुकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला तसेच द.ग.तटकरे चौकात काही दिवसापूर्वी या मार्गांवरील प्रचंड मोठया प्रमाणात जड अवजड वाहनांच्या रहदारीमुळे मोठा खड्डा पडला आहे यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांना खबरदारी घ्यावी लागते याशिवाय मोठी तारेवरची कसरत करावी लागत असून कोलाड बाजारपेठेत चौपदरीकरणाच्या उड्डाण पुलाच्या कामाला लागलेली गळती रोहा कडून मुंबई व महाड बाजूस तसेच महाड कडून मुंबई कडे जाणारी वाहतूक याच बाजूच्या रस्त्यावरून सुरु आहे त्यामुळे अधिकची वाहातुक कोंडी त्याच हा भला मोठा खड्डा वाहनचालकांना डोके दुखी ठरत असल्याने आपघताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रवाशी वर्गातून एकच संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई-गोवा महामार्गवरील आंबेवाडी (कोलाड )हे मध्यवर्ती ठिकाण असुन कोलाड बाजारपेठेत या परिसरातील असंख्य गावातील असंख्य नागरिक बाजारासाठी येजा करीत असतात तसेच धाटाव एम.आय. डी.सी.कडे जाणारे कामगार, तसेच रोहा,अलिबाग,मुरुड कडे जाणारे प्रवाशी याच मार्गाने प्रवास करीत असतात यामुळे येथे वाहनांची प्रचंड वर्दळ सुरु असते या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होत आहे.तसेच खांब, माणगाव, व सुतारवाडी या तिन्हीही बाजुकडून रोहा बाजूकडे जाणारी वाहने याच मार्गांवरून जात असतात येथे कोलाड ट्रॉफीक पोलिस व ट्रॉफीक वार्डन वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभे असतात परंतु या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे खड्डा चुकविण्याच्या नादात घाई गडबडीने वळसा घालतांना काही वेळा ही वाहने ट्राफिक पोलिस व ट्रॉफीक वार्डन यांच्या अंगावर ही वाहने जात असल्याचे दिसून येत आहे.यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर संबंधितांनी लक्ष देऊन हा खड्डा सिमेंट काँक्रेटने भरण्यात यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.