कोलाड-आंबेवाडी येथे बनावट तणनाशक साठा जप्त; खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टळली!

Kolad tannashak satha japt
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथे कृषी विभागाने कोलाड पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत २ लाख ६८ हजार ८०० रुपये किमतीचा बनावट तणनाशक साठा जप्त केला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक टळल्याने कृषी विभागाच्या वेळीच झालेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.
आंबेवाडी येथील ‘ओम तेल घाणा’ केंद्रात अनधिकृतपणे तणनाशक विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर, त्यांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी Linuxcrop Chemicals Pvt. Ltd. (राजकोट, गुजरात) या कंपनीच्या २८० बाटल्या (प्रति बाटली ९६० रुपये) विनापरवाना साठवलेल्या असल्याचे आढळून आले. विक्रेत्याकडे कोणताही वैध परवाना अथवा नोंदणी क्रमांक सापडला नाही.
ही धडक कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदेजिल्हा कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी महेश नारायणकर आणि गुणवत्ता निरीक्षक बुद्धभूषण मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कोलाड पोलिसांचे निरीक्षक नितीन मोहिते व तपास अधिकारी पोसई एस.जी. भोजकर अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणात धनजीभाई लाखाभाई कातारीया (वय ५४) रा. आंबेवाडी (मूळ रा. वसई) यांच्यावर फसवणूक व कीटकनाशक अधिनियम १९६८ व नियम १९७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading