मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील कै.द.ग.तटकरे मेन चौकातील उड्डाणपुलाच्या काम ठप्प त्याला गेली अनेक दिवस गळती त्यामुळे नाक्यावर अनेक समस्यांना नागरीकांना सामोरे जावे लागत होते, मात्र त्याचे काम पुन्हा कमालीची यंत्रणा लावत सुरू झाले आहे ही आनंदाची बाब आहे तर दुसरीकडे हे काम सुरू असताना त्यामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रणाची गरज असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुल व रस्त्याच्या कामात दिवसेंदिवस विलंब होत असल्यामुळे या समस्यमुळे ग्रासलेले कोलाड आंबेवाडी वरसगाव विभागातील सुज्ञ नागरिक कमालीचे हैराण होत असल्याचे दिसून येत होते तर सदरच्या ठप्प झालेल्या कामाचा तसेच त्यांच्या विलंबनाच्या कामाबाबत आमच्या वृत्त पत्राने अनेकदा त्याचा पाठपुरावा केला तसेच या रखडलेल्या कामाबाबत येथील ग्रामस्थ नागरिकांनी या बाबत उपविभागीय दंडाधिकार रोहा यांना लेखी तक्रार निवेदन देण्यात आले होते.
मात्र त्यानंतर आता पुन्हा या उड्डाण पुलाच्या कामात गती आली असून काम सुरू असताना वाहक चालकांनी कोंडीवर नियंत्रणाची गरज आहे तसेच संबंधित वाहतूक यंत्रणेने देखील यावर अधिक लक्ष केंद्रित करून यावर अधिक उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी येथील स्थानीक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
———————————————-
मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील कै.द.ग. तटकरे चौकातील उड्डाण पुलाचे काम गेली अनेक दिवस ठप्प होते. मात्र त्या कामाला पुन्हा गती येताना दिसून येत आहे याचा आनंद आहे, मात्र हे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित खात्याने तसेच ठेकेदाराने शर्थीचे प्रयत्न करून येथील नागरिकांच्या घश्या तोंडात जाणारी धूळ आणि वाढती वाहतूक कोंडी यावर अधिक उपाय योजना करण्यात यावी मार्गावर जड अवजड वाहनांची वाहतूक तसेच त्याला जोडला गेलेला रोहा मार्ग त्यामुळे भर चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यावर ठोस उपाययोजना संबंधित खात्याकडून करण्यात यावी त्याच बरोबर नियमित वाहनचालकांनी देखील वाहतुक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.अशी मागणी येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
……डॉ.मंगेश सानप, सामजिक कार्यकर्ते कोलाड.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.