
कोलाड नाक्यावरील उड्डाण पुल व रस्त्याची खासदार सुनिल तटकरे यांच्या कडून पाहणी, नॅशनल हवेच्या अधिकाऱ्यांला धरले धारेवर
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
मुंबई गोवा महामार्गाचे काम सरकारने हाती घेतल्यापासून त्या कामात ठेकेदार याचा मनमानी कारभार सुरू आहे तर गेली अनेक वर्ष रखडलेल्या कामाबाबत अनेकांची नाराजी तर काही ठिकाणी ग्रामस्थ नागरिकांना विश्वासात न घेतात मनमानी कारभार, याचा ठराव ही आंबेवाडी ग्रामपंचायत घेण्यात आला. तरीही दुर्लक्ष झाल्यामुळे सदरच्या मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाचे सुरू असलेल्या कामावर ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत १० जानेवारी रोजी अमरण उपोषणाची तयारी दर्शवित असल्याची माहिती अनेक वृत वहिन्यांसाह ‘PEN न्यूज’ मध्ये प्रकाशित होताच याची दखल घेत रायगडचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट खासदार सुनिल तटकरे यांनी या उड्डाण पुल व रस्त्याची पहाणी करून संबंधित अधिकारी याला धारेवर धरत पुढील निर्णय होईपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यशवंत गोठकर, विजय जैने, पाटीदार, रोहा उपविभागीय अधिकारी, राजेंद्र दौडकर,कोलाड सपोनि नितीन मोहिते, अंमलदार नरेश पाटील,मंगेश पाटील, युवा कार्यकर्ते राकेश शिंदे, संतोष बाईत, संजय मांडलूस्कर, संजय राजीवले,कुमार लोखंडे,बंडया राजीवले,शैलेश सानप,भरत सातांबेकर, जगदीश प्रभू,लाला शिंदे,प्रदिप एकबोटे,अविनाश पलंगे, प्रफूल बेटकर,पारसमल जैन, भावेश जैन, उदय राजपूरक,प्रमोद लोखंडे, जोपा सेठ असंख्य व्यापारी वर्ग, रिक्षा तसेच मिनिडोअर संघटनेचे पदाधिकारी व असंख्य सदस्य उपस्थित होते.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी रेल्वे क्रॉसिंग जवळ होत असलेली वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात याविषयी उपाययोजना करण्यासाठी ठेकेदार याच्या जवळ चर्चा केली शिवाय उड्डाण पुलाचे पिलर हे अंबर सावंत मंदिरा पर्यंत होणार यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चर्चा करण्यात येईल तसेच ग्रामस्थांच्या विविध समस्यावर उपाययोजना करण्यात येईल असे सांगण्यात आले.