कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग ,रायगड व मावळ लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाचा सामना विधानसभा निवडणुकीत देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बसल्यानंतर सिंधुदुर्ग पासून रत्नागिरी ते रायगड पर्यंत शिवसेनेच्या माजी आमदारांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर देखील उरलीसुरली शिवसेना संपवण्यासाठी पराभूत झालेल्या माजी नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली की काय ?असा सवाल कोकणातील निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विचारीत आहेत
लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासह रायगड व मावळ या लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर त्याचा प्रत्यय पुन्हा विधानसभा निवडणुकीत पाहण्यास मिळाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या तीन ,रत्नागिरी जिल्ह्यातील पाच व रायगड जिल्ह्यातील सात या विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ गुहागर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार व शिवसेना नेते व संभाव्य विरोधी पक्षनेते भास्करराव जाधव यांचा अपवाद वगळता सर्वच जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला पराभव का झाला याची कारणे – मीमासा तपासली नाही परिणामी सिंधुदुर्ग रत्नागिरी सह रायगड जिल्ह्यातील अनेक माजी आमदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला
कोकणातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांना धीर देण्याऐवजी निष्ठावंत शिवसैनिकांच्या विरोधात जाऊन लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या माजी नेत्यांच्या सल्ल्यावरून अनेक पदाधिकाऱ्यांना पदांच्या खिरापती वाटल्याने निष्ठावंत शिवसैनिक कोकणात नाराज झाला आहे याची दखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुखांना सुतराम कल्पना नसल्याने कोकणातील ग्रामीण भागातील निष्ठावंत शिवसैनिकांनी अखेर थंड बसण्याचा निर्णय घेतला असून अनेकांनी आपले राजकीय अस्तित्व जपण्यासाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे
रत्नागिरी ,सिंधुदुर्ग व रायगड या लोकसभा मतदार संघा सहित विधानसभा मतदारसंघात नवीन पदाधिकारी निवडताना निष्ठावंत स्थानिक शिवसैनिकांना विश्वासात न घेता मर्जीतील पदाधिकाऱ्यांना पद देण्याचा सपाटा पराभू त नेत्यांनी चालविल्याने कोकणात मोठ्या प्रमाणावर आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत
जनमानसात प्रतिमा मलीन झालेल्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्याची निष्ठावंत शिवसैनिकांची मागणी!
लोकसभा निवडणुकीत मोठा पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या रत्नागिरी -सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची जनमानसातील प्रतिमा पूर्णपणे संपुष्टात आली असून त्यांच्या वागणुकीचा परिणाम विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आला असताना देखील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील शिवसेना पक्षप्रमुख या नेत्यांच्या हातात पुन्हा संघटनेचे नेतृत्व देऊन काय साध्य करू इच्छितात असा सवाल निष्ठावंत शिवसैनिक विचारीत आहेत कोकणातील उरली सुरली शिवसेना या नेत्यांच्या हम करे सो या म्हणी (शिवसैनिकांना देण्यात येणाऱ्या वागणुकीमुळे) अनेक शिवसैनिक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजपा व शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यास नवल वाटू नये अशी स्थिती कोकणातील ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे
जुन्या निष्ठा वंत पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याचा एक कलमी कार्यक्रम?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याचा व पदावरून हटवण्याचा एक कलमी कार्यक्रम शिवसेना भवनात बसून लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले नेते करीत असल्याची चर्चा रायगड रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे यामुळे लवकरच रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात उरले सुरले शिवसेनेचे जुने जाणते निष्ठावंत पदाधिकारी शेकडो शिवसैनिकांसह लवकरच भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकंदरी कोकणात शिवसेनेला घरघर लागण्याची शक्यता येत्या काही दिवसात होण्याची वर्तवली जात आहे
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.