2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील 15 जागांपैकी काँग्रेसला एकही जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद असल्यामुळे काँग्रेसचे कोकणातील स्थान कमकुवत झालं आहे.
रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही, आणि माजी आमदारांचाही प्रभाव संपुष्टात आला आहे. अलिबाग मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी मागितली असली तरी ती शिवसेनेने शेतकरी कामगार पक्षाला दिल्याने काँग्रेससाठी आव्हान राहणार आहे. श्रीवर्धनमध्येही राष्ट्रवादीची ताकद कायम असून, इथं शरद पवार गटाने उमेदवार उभा करण्याची योजना आखली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात देखील काँग्रेसला विशेष संधी नाही. गुहागर, राजापूर मतदारसंघांवर उद्धव ठाकरे गटाने पकड मजबूत ठेवली आहे, तर अजित पवार गट चिपळूणमधून उमेदवार देणार आहे. सिंधुदुर्गातही काँग्रेसची स्थिती सुधारण्याची शक्यता नाही. कुडाळ आणि सावंतवाडी या जागांवर शिवसेना वर्चस्व राखणार आहे.
कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार संघाची नावे व व उमेदवार सद्यस्थितीत पक्षाकडे आहेत त्याची माहिती पुढील प्रमाणे;
रायगड जिल्हा १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघ प्रशांत रामशेठ ठाकूर भाजपा पक्ष १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघ महेंद्र सदाशिव थोरवे, शिवसेना पक्ष (परंतु सध्या शिंदे गटाकडे) १९० उरण विधानसभा मतदारसंघ महेश बालदी अपक्ष +परंतु भाजपा पुरस्कृत) १९१ पेण विधानसभा मतदारसंघ रवींद्र दगडू पाटील (भाजपा पक्ष) १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ कुमारी आदिती सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परंतु (सध्या अजित पवार गट) १९४ महाड विधानसभा मतदारसंघ भरत मारुती गोगावले शिवसेना पक्ष परंतु (सध्या शिंदे गट)
रत्नागिरी जिल्हा २६३ दापोली विधानसभा मतदारसंघ योगेश रामदास कदम शिवसेना पक्ष परंतु( सध्या शिंदे गट) २६४ गुहागर विधानसभा मतदारसंघ भास्कर भाऊराव जाधव शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) २६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघ शेखर गोविंदराव निकम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (परंतु सध्या अजित पवार गट) २६६ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ उदय रवींद्र सामंत शिवसेना पक्ष परंतु( सध्या शिंदे गट) २६७ राजापूर विधानसभा मतदारसंघ राजन प्रभाकर साळवी शिवसेना पक्ष( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
सिंधुदुर्ग जिल्हा २६८ कणकवली विधानसभा मतदारसंघ निलेश नारायण राणे (भाजपा पक्ष) २६९ कुडाळ विधानसभा मतदारसंघ वैभव विजय नाईक शिवसेना पक्ष( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
२७० सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दीपक वसंतराव केसरकर शिवसेना पक्ष परंतु (सध्या शिंदे गट)
यावरून काँग्रेसचं कोकणातील नेतृत्व सध्या निष्क्रिय झाल्याचं स्पष्ट होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.