तालुक्यातील खारपाडा गावातील एक नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक, राज्यस्तरीय व्यसनमुक्तीदुत, सामाजिक कार्यकर्ते, युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन (एनजीओ ) संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि उत्कृष्ठ पत्रकारिता कार्याचा सन्मान जन राष्ट्रीय रेल्वे शू शाईन कामगार युनियन प्रणित जन राष्ट्रीय कर्मचारी युनियन र.न.ए.एम कार्यासान १७/११३०३ यांचे वतीने शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता कस्तुरबा हॉल सेनापती बापट रोड माटुंगा पश्चिम रेल्वे स्टेशन समोर मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय धर्मगुरू अरुणानंद महाराज (मॉरिशस), विश्वगुरू नामदेव महाराज हरल यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक दिपक कालिंगण , कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत दादा राणे (अध्यक्ष धडक कामगार युनियन), नंदकिशोर खानविलकर (अध्यक्ष जनरल एम्प्लॉइज युनियन), किसन बोंद्रे, नीलेशजी सांबरे, दत्ताभाऊ जवळगे ( निर्माता दिग्दर्शक ), अनीलाजी शुक्ला (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कामगार मंच) डॉक्टर मनोहर सासे(अध्यक्ष मुंबई जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन),सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था,श्री संदीप पाटील महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ, या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डी वाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सरचिटणीस पत्रकार कैलासराजे घरत यांना राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका अखंडपणे सुरूच आहे.
राष्ट्रीय पुरस्कार:- १) महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार-२०२३ २) राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव सन्मान-२०२३ ३) छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार-२०२४ ४) नॅशनल एक्सलेन्ट अवॉर्ड २०२४
राज्यस्तरीय पुरस्कार :- १) कोकणभूषण पुरस्कार-२०२३ २) समाजरत्न पुरस्कार-२०२३ ३) छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार-२०२४ ४) महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४
राज्यातील अनेक सामाजिक संस्थांनी व संघटनांनी सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकार कैलासराजे घरत गेल्या 15 ते 20 वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अंधश्रध्दा निर्मूलन, आरोग्य, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, सर्प जनजागृती माहिती व्याख्यानमाला, शिवशंभू चरित्र व्याख्यानमाला, जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन, गड संवर्धन आणि गडकोट स्वच्छता अभियान, एसएससी विद्यार्थी मार्गदर्शन आणि शैक्षणिक साहित्य वाटप, एसएससी विद्यार्थी गुणगौरव समारंभ सोहळा, जागर दुर्गांचा ध्यास गडकोट संवर्धनाचा, आदिवासीवाडी वस्त्यांवर मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गणवेश वाटप, आरोग्य शिबिर, फर्स्ट एड किट वाटप आरोग्य सुविधांसाठी प्रयत्न करीत आहेत. आदिवासी भागात बालविवाह प्रतिबंधक मार्गदर्शन शिबिर राबवून जनजागृती करत आहेत. विविध शालेय दाखले काढणे, विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, परिचारिका, प्रवेश प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते त्याचबरोबर विविध कंपनीमध्ये ॲप्रेंटीसशिप, रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संभाषण कला, रांगोळी स्पर्धा, किल्ले बनविणे स्पर्धा, आर्ट्स अँड क्राफ्ट्स, सुवाचन स्पर्धा, सेल्फ डिफेन्स सेमिनार, अक्षर सुलेखन, गुड हॅबिट्स, अभ्यास कसा करायचा, शिवशंभू प्रश्न मंजुषा स्पर्धा, योगा वर्ग, बाल संस्कार वर्ग, वीर महापुरुष यांचे कार्य, गडकिल्ले कसे पाहवेत याची माहिती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन द्वारे देणे, विविध कला, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. वाचन चळवळ उभी राहण्यासाठी लवकरच जनसहकार्यातून अद्ययावत ग्रंथालय उभारण्यात येणार आहे.
सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपल्या लेखणीच्या, पत्रकारितेच्या माध्यमातून खारपाडा सावरोली सर्व्हिस रस्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले. संपूर्ण रायगड उरण पेण पनवेल अलिबाग तालुक्यात येणाऱ्या एमएमआरडीए सारख्या शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या प्रकल्पाविरोधी हरकतींचे अर्ज भरून घेण्यासाठी सक्रिय सहभाग. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शिबिरात सक्रिय सहभाग, जनसामान्यांना न्याय मिळावा म्हणून अनेक जन आंदोलनात, मोर्चे, धरणे यामध्ये सक्रिय सहभाग तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, अपंग ओळखपत्र, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सवलत पास, विद्यार्थी, अनाथ, अपंग, विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल, शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आदिवासीवाडी वस्तीवर माणुसकीचा वसा जोपासत गावागावात विविध शिबिरांचे आयोजन केलं जातं आहे.
राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, धर्मवीर संभाजी महाराज जयंती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी, शिवराज्याभिषेक सोहळा, थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्याची, विचारांची माहिती पोहचविणे.
१५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दीन, २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन, १ मे- महाराष्ट्र दीन ,२६ नोव्हेंबर- संविधान दीन हे राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात. ते विविध क्षेत्रांमध्ये स्वयं प्रेरणेने आणि तळमळीने सातत्याने गेल्या २० वर्षापासून चालू आहे.तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत.
सन्मानिय कैलासराजे घरत एक उत्तम निर्भिड पत्रकार असून जनसामान्यांच्या समस्यांना, अन्यायाला आपल्या लेखणीच्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अपघात ग्रस्तांना उपचारासाठी मदत, शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य करणे असे कोणतेही क्षेत्र बाकी नाही. जिथे कमी तिथे आम्ही. त्यांचे कार्य हीच त्यांची ओळख बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या एका कार्यकुशल, हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा “राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज” राष्ट्रीय पुरस्कार २०२४ सन्मानित करण्यात
आल्याबद्दल विविध राजकीय, विविध सामाजिक संघटना, डी वाय फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई पत्रकार संघ, पत्रकार मित्र, पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अशी माहिती पनवेल पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार सुनील पाटील आणि कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कालिंगण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.