केंद्रप्रमुख श्वेता म्हात्रे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य नाविन्यपूर्वक व दिशादर्शक : उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे

Sweta Mhatre
पेण :
केंद्रप्रमुख श्वेता चंद्रकांत म्हात्रे यांनी केंद्रप्रमुखपदी कार्यरत असताना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असून त्यांचे कार्य पुढच्या पिढीला नेहमीच दिशादर्शक राहतील असे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी संतोष शेडगे यांनी श्वेता म्हात्रे यांच्या सेवापुर्ती कार्यक्रम प्रसंगी काढले. ते पुढे म्हणाले की, शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या योजना आपल्या शाळांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
वरसई, आंबेघर केंद्राच्या केंद्रप्रमुखा श्वेता चंद्रकांत म्हात्रे यांचा सेवापुर्ती सोहळा नुकताच एजी फार्म हाऊस पेण येथे पार पडला.या कार्यक्रमासाठी पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे जिल्हा परिषद शिक्षण विभाग कक्ष अधिकारी संजय कवित्के, अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोकण अध्यक्ष प्रमोद पाटील ,सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाचिटणीस अमरचंद पाटील, शिक्षक भारती संघटनेचे कोकण प्रांत अध्यक्ष ज.स.म्हात्रे, शिक्षक नेते जगदीश म्हात्रे,शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष महेंद्र गायकवाड, पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक मोहन भोईर विठोबा पाटील, कैलास भोईर, आजी माजी केंद्रप्रमुख व गागोदेव आंबेघर केंद्रातील शिक्षक वर्ग आदिसह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी बोलताना म्हणाल्या की, एक अभ्यासू तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्यासोबत सदैव आपुलकीने वागणा-या तसेच कोणत्याही प्रकारच्या माहितीची पूर्तता करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. श्वेता म्हात्रे या एक उपक्रमशील केंद्रप्रमुखा अशी त्यांची पेण तालुक्यात ओळख होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या केंद्रांमध्ये अनेक उपक्रम, कार्यशाळा राबवल्या विशेषतः गागोदे केंद्रात केंद्रप्रमुख म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी राबवलेले उपक्रम अनुकरणीय ठरले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी कला व क्रीडा यांमध्ये निपुण व्हावेत म्हणून त्यांनी अनेक स्पर्धा घेतल्या अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रातील शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सावंत यांनी केले.
Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading