कृषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ व चाण्यक ग्रुप मुंबई यांनी जपली सामाजिक बांधिलकी

school
पोयनाड ( जीवन पाटील ) : कृषीतुल्य शिक्षण प्रसारक मंडळ संस्था व चाणक्य ग्रुप यांच्या वतीने आणि गुरूवर्य  शशिकांत खामकर सरांच्या मार्गदर्शनाने ( विनर्स – आध्यात्मिक व्यवसाय प्रशिक्षक) अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आदिवासी शाळा पनवेल यांच्या मागणीनुसार त्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी, ताडपत्रीचे 6 नग आणि मुलांसाठी खाऊ  देण्यात आले या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांची उपस्थिती लाभली तसेच स्पार्टन ग्रुपच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी शाळेतील जवळ जवळ पाचशे हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नुकतेच झालेल्या इर्शालवाडी दुर्घटनेत देवाज्ञा झालेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली  त्यानंतर भारत मातेच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवर. व विद्याथी मिळून सामूहिक आरती  घेण्यात आली , मेडीटेशन करण्यात आले   तदनंतर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक  श्रीमती क्रांती कृष्णा पाटील व प्राथमिक  शाळेचे मुख्याध्यापक वैशाली पाटील यांनी मायेची  शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ  देऊन स्वागत केले मुलांना देशभक्तीपर गीते सादर करून भारत मातेच्या बद्दल आदर भाव व्यक्त करत भारत मातेकी जय , वंदे मातरम्, अशी घोषणाबाजी करीत सारा परिसर दुमदुमून गेला तर उपस्थित सर्व शाळेतील विद्यार्थी मिळून सात प्रकारच्या टाळ्या वाजवत सर्वांना मंत्र मुगध्य केले.
यावेळी आपल्या मनोगतात चाणक्य ग्रुपचे अध्यक्ष  सूर्या रणदिवे तर आण्णा पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन करीत विज्ञान, तंत्रज्ञान, युगात आपले सप्न पूर्ण करण्याकरिता प्रथम आपण आनंदी, निरोगी, व श्रीमंती आपणा कडे कशी येईल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आपण सकारात्मक दृष्टीने विचार केले पाहिजेत तरच आपण येल्य तीराहून पैल्य तिरास सुखरूप जाऊ शकतो. मंडळाचे पदाधिकारी आण्णा पाटील, अनुप देसाई , प्रसाद वाळंज, निशिकांत पाटील, सार्थक बांद्रे,  मालिसा  बांद्रे, ओंकार रेलेकर, रुपाली शिताप , साई कुळे, विनायक मसुरकर, किशोरी पवार, दीपक रणखांबे, आदींनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading