कुर्डूस व शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला भगिनींचा संवाद मेळावा पांडवादेवी, पोयनाड येथील हॉटेल पाटील ब्रदर्समध्ये उत्साहात पार पडला. या मेळाव्यात बहुसंख्य महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेनेवर आपला ठाम विश्वास दाखवून दिला. स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेची ताकद या मेळाव्यातील उत्साही उपस्थितीने प्रकर्षाने जाणवली.
महिला भगिनींचा सन्मान म्हणून साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित महिला भगिनींना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम महिलांमध्ये एकात्मता व शिवसेनेप्रती निष्ठा वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये शिवसेना नेत्या मानसी ताई दळवी, जिल्हा संपर्क संघटिका संजिवनी नाईक, जिल्हा महिला प्रमुख तृप्ती, तालुका प्रमुख भाग्यश्री नंदन पाटील, संघटक जिवन पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, मधुशेठ पाटील, रेश्मा जोशी, संकेत पाटील, उज्वल पाटील, सचिन धुमाळ, शैलेश पाटील, विभाग प्रमुख स्वप्नील म्हात्रे, अक्षय पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
महिलांनी केलेल्या या उत्स्फूर्त उपस्थितीने व सहभागाने शिवसेनेची ताकद आणि कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.