कुर्डुस येथे रंगला जिल्हास्तरीय कबड्डीचा थरार ! मरीदेवी धेरंड संघाची बाजी

kabaddi-kurdus
शिहू ( मंजुळा म्हात्रे ) : रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व यंगस्टार सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ कुर्डुस आयोजित भाजपा चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन कै. नथुराम चांगु शेरमकर क्रीडा नगरीत करण्यात आले होते.
या सामन्यांचे उद्धघाट्न भाजपा जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, ऍड. महेश मोहिते, माजी आमदार धर्येशील पाटील, राजेश मपारा यांच्या हस्ते संपन्न झाला. या भव्य कबड्डी सामन्यांना अनेक मान्यवरांची उपस्थीती लाभली.
या स्पर्धेत ३२ संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्यांमध्ये अंतिम लढत मरीदेवी धेरंड विरुद्ध चौडेश्वरी कडसुरे यांच्यामध्ये झाली. या अटीतटी च्या लढतीमध्ये मरीदेवी धेरंड संघाने ७ गुणांनी मात करून प्रथम क्रमांक (३१००० रुपये व आकर्षण चषक ) पटकवला, द्वितीय क्रमांक चौडेश्वरी कडसुरे ( २१००० रुपये व चषक), तृतीय टी. बी एम कारावी, व चतुर्थ हनुमान उचेडे संघाला ११०००रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू ऋतिक पाटील, उत्कृष्ट चढाई जयेश गावंड तर शिस्तबद्ध संघ म्हणून जयगणेश वाशी रोहा संघाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी यंगस्टार सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनंत पाटील, उपाध्यक्ष प्रदीप म्हात्रे यांच्या मार्गदर्शना खाली सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading