अलिबाग तालुक्यातील किहीम येथील साईनगर येथे साईबाबा मंदिरात रविवार दि.६ एप्रिल रोजी श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दर्शनासाठी उपस्थित किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड व इतर मान्यवरांचा ओम साई सेवा मंडळातर्फे शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी पिंट्या गायकवाड यांच्यासोबत माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर, माजी सदस्या रविना ठाकूर, किहीम ग्रामपंचायत उपसरपंच बाबुराव पडवळ, चांदोरकर सर, ओम साई सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश सोहनी, सचिव किरण ठाकूर, प्रसन्न ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य संतोष किर, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, कलाकार योगेश पवार, व इतर मान्यवर तसेच महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.