कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रायगड जिल्ह्यात तसेच रोहा तालुक्यातील खांब विभागातील ऐतिहासिक शिवकालीन आसलेल्या सुरगड किल्ल्यावर स्थानिक सुरगड संस्थेची गड संवर्धन मोहीम राबवण्यात आली. रविवारी ७ एप्रिल २०२४ रोजी स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची एकोंत्तीसावी मोहिम यशस्वी झाली.
सदर मोहिमेमधे उत्तर बुरूजाकडील गाळमुक्त केलेल्या टाकीतील मोठे दगड, चिरे काढण्याचे काम करण्यात आले. ते काम पुर्ण झाल्यानंतर सुरगडाच्या शिलेदारांनी बालेकिल्यातील पाण्याचं टाकं साफ करण्यास सुरूवात केली. हे टाकं १७ फुट लांब तर ९ फुट रूंद आहे.त्यातील सव्वादोन फुटापासुन तब्बल ६ फुटा पर्यंत एका कोपऱ्यातील चिखल गाळ, दगड गोठे काढण्यात शिलेदारांना यश आलं आहे. या टाकीच्या गाळामधेे आज एक मोठा तळखडा सापडला. सदरील तळखडा टाकीच्या बाजूलाच वर उभा करून ठेवण्यात शिलेदार यशस्वी झाले आहेत.