किल्ले रायगड वरील ६०० कोटीच्या विकास कामांचं झालं वाटोळं; ठेकेदार, अधिकारी झाले गब्बर?

किल्ले रायगड वरील ६०० कोटीच्या विकास कामांचं झालं वाटोळं; ठेकेदार व अधिकारी झाले गब्बर?
महाड (मिलिंद माने) :
किल्ले रायगड परिसर विकास आराखड्यातील झालेल्या कामांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली व राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या नियोजनाखाली चौकशी करण्याची मागणी किल्ले रायगड परिसर ग्राम विकास समितीच्या सरचिटणीस सुभाष मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता राज्य शासन खरोखरच या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करते काय याची उत्सुकता तमा राज्यातील शिवप्रेमींना लागली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रादेशिक पर्यटन विकास योजना व रायगड किल्ला परिसर विकास आराखड्यातील झालेल्या सर्व कामांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली व राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या नियोजनाखाली झालेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या ठेकेदारांशही रायगड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर व शाखा अभियंत्यांवर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई कोणत्या स्वरूपाची करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांची कामे बोगस रित्या करून ठेकेदार व अधिकारी मालामाल झाले असल्याची प्रतिक्रिया रायगड विकास परिसर ग्राम समितीचे सरचिटणीस सुभाष मोरे यांनी याबाबत बोलताना सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंची पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली व पर्यटन विभाग तसेच राज्य शासनाने नव्याने निर्माण केलेल्या रायगड किल्ला परिसर विकास आराखडा म्हणजेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून व रायगड जिल्हा नियोजन समितीच्या देखरेखीखाली रायगड किल्ला व परिसर विकास योजनेअंतर्गत पूर्वीची अंदाजीत रक्कम६०६. ०९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यामध्ये झालेल्या कामांची गुणवत्ता व दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून या कामांची राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली व राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या नियोजनाखाली या सर्व कामांची पाहणी करून रायगड किल्ला प्राधिकरण भ्रष्टाचार मुक्त करण्याची मागणी या निवेदनाद्वारे सुभाष मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अभय सिंह राजे भोसले यांच्यासहित माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्या शहीद राज्याचे मुख्य सचिव रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
रायगड किल्ला विकास प्राधिकरणाअंतर्गत सन२०१७ सालापासून रायगड किल्ला व परिसरातील गावांचा विकास करण्याचे काम या मध्ये रायगड किल्ला परिसरातील २१ गावातील रस्ते पायवाटा, पुरातन ऐतिहासिक मंदिरे त्या ठिकाणी बांधण्यायोग्य सभागृहे, तसेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत्र (विहिरी) तयार करणे ,शिवकालीन मंदिर, तसेच गावातील अंतर्गत रस्ते ,जोड रस्ते, त्याचप्रमाणे किल्ल्यावरील ऐतिहासिक पाऊलवाटा ची दुरुस्ती करणे तसेच गड किल्ल्यावरील संरक्षक भिंत बांधणे पाण्याचे तलावाचे सुशोभीकरण व दुरुस्ती करणे, पर्यटन विकास योजनेअंतर्गत शासकीय विश्रामगृहाची दुरुस्ती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस दूरक्षेत्र व पोलीस चौकी उभारणे यासारखी अन्य कामे झाली आहेत या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून मोठ्या प्रमाणावर या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने शासनाचे लाखो रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडला आहे. मात्र या कामांची जबाबदारी ज्या सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत रायगड प्राधिकरणातील काम करणाऱ्या अभियंत्यांवर आहे त्या अभियंत्यांनी मर्जीतील ठेकेदारांनाच कामे देऊन करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याने रायगड किल्ल्याचा विकास होण्याऐवजी रायगड किल्ल्याचा भकास झाल्याचे चित्र या परिसरात पाहण्यास मिळत आहे त्यामुळे रायगड प्राधिकरणा अंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी अशी आग्रही मागणी सुभाष मोरे यांनी या निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
रायगड प्राधिकरण अंतर्गत झालेल्या सर्व कामांची यादी पुढीलप्रमाणे;
१) किल्ले रायगडाच्या पायथ्याशी सूचना फलक बसवणे ८.९९ लक्ष रुपये
२) किल्ले रायगडावर होळीचा माळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पंचधातूचे ऐतिहासिक छत्र उभारणे ५५.६९ लक्ष रुपये
३) किल्ले रायगडावर कायमस्वरूपी मंडपाची उभारणी करणे १०३.४१ लक्ष रुपये
४) होडगाव ताम्हणे कडापूर घरोशी रस्ता तयार करणे ४५२.८६ लक्ष रुपये
५) बिरवाडी मांग घरून वाघोली रस्ता तयार करणे १४४०.०६ लक्ष रुपये
६) रायगड किल्ल्यावरील खू ब लढा बुरुज ते नाणे दरवाजा पदपथाचे बांधकाम करणे२४०. ४५ लक्ष रुपये
७) किल्ले रायगडावर हत्ती तलावाजवळ स्टॉलची उभारणी करणे२०१. ०० लक्ष रुपये
८) नाणे दरवाजा ते महादरवाजा पदपथावर नाणेदरवाजावरील बाजू स्वच्छतागृह व सुविधा केंद्र उभारणे२२०. ०० लक्ष रुपये
मौजे पाचाड येथील पोलीस चौकीच्या परिसर चा विकास करणे१२५. ०० लक्ष रुपये
९) अमडुशी धनगर वाडी ते परडी रस्ता तयार करणे६५. ०० लक्ष रुपये
१०) मौजे पुनाडेवाडी येथे विहीर बांधणे २०.०० लक्ष रुपये
११) मौजे पुनाडे गावठाण येथे विहीर बांधणे३०. ०० लक्ष रुपये
१२) मौजे पुनाडे वाडी येथे स्मशानभूमी बांधणे१५. ०० लक्ष रुपये
१३) खर्डी नगर भुवन येथे विहीर बांधणे २०.०० लक्ष रुपये
१४) खर्डी नगर भुवन येथे अंतर्गत रस्ता तयार करणे१५. ०० लक्ष रुपये
१५) कोंझर येथे सभामंडप बांधणे१५. ०० अक्षर रुपये
१६) कोंझर येथे अंतर्गत रस्ता तयार करणे१५. ०० लक्ष रुपये
१७) कोंझर येथे स्मशानभूमी बांधणे१५. ०० लक्ष रुपये
१८) पाचाड नाका वेदगुडे आळी येथे नाला बंदिस्त करणे१५. ०० लक्ष रुपये
१९) वाघेरी आदिवासी वाडी रस्ता तयार करणे २०.०० लक्ष रुपये
२०) ग्रामपंचायत निजामपूर रायगड वाडी परडी येथे विहिरीचे बांधकाम करणे १८.०० लक्ष रुपये
२१) पाने येथे शाळेजवळ संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे१२. ०० लक्ष रुपये
२२) हिरकणी वाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे१०. ०० लक्ष रुपये
२३) शिंदे आव्हाड विहीर दुरुस्ती करणे १०.०० लक्ष रुपये
२४) नेवाळी वाडी सभा मंडप बांधणे १०.०० लक्ष रुपये
२५) निजामपूर स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता तयार करणे१०. ०० लक्ष रुपये
२६) पाचाड सोमजाई सभा मंडप बांधणे १०.०० लक्ष रुपये
२७) रायगड वाडी बौद्ध समाजासाठी सभागृह बांधणे १५.०० नको लक्ष
२८) बावळे विहीर दुरुस्ती करणे १०.०० लक्ष रुपये
२९) कावळे अंतर्गत रस्ता तयार करणे १०.०० लक्ष रुपये
३०) सावरट खडकवाडी सभागृह बांधणे १०.०० लक्ष रुपये
३१) टकमकवाडी साकव बांधणे ७.०० लक्ष रुपये
३२) खडकी वाडी साकव बांधणे ७.०० लक्ष रुपये
३३) बावळे स्मशानभूमी बांधणे ३.०० लक्ष रुपये
३४) हिरकणी वाडी सभा मंडप बांधणे २०.०० लक्ष रुपये
३५) पाचवा ते शिंदे आव्हाड रस्ता तयार करणे ३०.०० लक्ष रुपये
३६) किल्ले रायगडावरील नाणे दरवाजा ते मदार मोर्चा पदपथावरील दरीकडील बाजूस रेलिंग बसविणे २८.९७ लक्ष रुपये
३७) किल्ले रायगडावर बारा टाके साठी सुरक्षात्मक उपाययोजना व गाळ काढणे ३१.५३ लक्ष रुपये
३८) किल्ले रायगडावर काळा हौदासाठी सुरक्षात्मक उपाययोजना व गाळ काढणे३६. ७९ लक्ष रुपये
३९) किल्ले रायगडावर टकमक टोकाकडे जाणाऱ्या मार्गावर दरीकडील बाजूस रेलिंग बसविणे३१. ८९ रुपये
४०) किल्ले रायगड येथील चित्त दरवाजा परिसराचा विकास करणे ९७.८३ लक्ष रुपये
४१) किल्ले रायगडावर नाणे दरवाजा जवळ दगडी भिंत व पद पथ करणे ८४.०६ लक्ष रुपये
४२) किल्ले रायगडावरील पदपथाची स्वच्छता करणे १३.९९ लक्ष रुपये
४३) किल्ले रायगडावर जिल्हा परिषद विश्रामगृहाला मोनेर टाइल्स बसवणे ११.२७ लक्ष रुपये
४४) पाचाड येथे तलाठी कार्यालयाचे बांधकाम करणे २६.६१ लक्ष रुपये
४५) नेवाळी वाडी ते खडकी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १०३.०४ लक्ष रुपये
४६) खर्डी नगर भुवन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे११५. ६२ अक्षर रुपये
४७) कोंझजर येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे १०३.२० लक्ष रुपये
४८) वाघेरी येथे अंतर्गत रस्ता व संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे१०६. ४६ लक्ष रुपये
४९) रायगड किल्ल्यावरील महादरवाजा ते चित्त दरवाजा पदपथावर सुरक्षात्मक उपाययोजना व पर्यटकांकरिता मूलभूत सुविधांचे बांधकाम करणे११३. ६२ लक्ष रुपये
५०) खलई येथे पुलाचे बांधकाम करणे१३५. ५० लक्ष रुपये
५१) किल्ले रायगडावर नाणे दरवाजा ते मदार मोर्चा पदपथा व भूस्खलनाच्या ठिकाणी Gabion Wall बांधणे१२२. ६४ लक्ष रुपये
५२) रायगड किल्ल्यावर महादरवाजा ते चित्त दरवाजा पदपथावरील भूस्खलन झालेल्या ठिकाणी Gabion wall बांधणे१३७. १९ लक्ष रुपये
५३) मौजे पुनाडे तर्फे नाते (बौद्धवाडी) येथे अंतर्गत राष्ट्रा तयार करणे १२.२९ लक्ष रुपये
५४) किल्ले रायगड येथे नाणे दरवाजा पद पथाच्या समोरील बाजूस रायगड छत्री निजामपूर रस्त्यावर दगडी भिंत बांधणे २७५.४९ लक्ष रुपये
५५) मौजे पाचाड येथे हेलिपॅड चे बांधकाम करणे २७२.३८ लक्ष रुपये
५६) किल्ले रायगडावरील जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या मागील बाजूस विसावा शेड तयार करणे १७४.१२ लक्ष रुपये
५७) किल्ले रायगड येथील M T D C उपहारगृहाची दुरुस्ती करणे २४३.४८ लक्ष रुपये
५८) किल्ले रायगडावर जिल्हा परिषद विश्राम गृहासमोरील जागा विकसित व जवळच्या जोत्याचे संवर्धन करणे १५८.९१ लक्ष रुपये
५९) किल्ले रायगडावर जिल्हा परिषद विश्राम गुहा जवळ संरक्षण भिंत व पदपथ करणे २१२.१८ लक्ष रुपये
६०) किल्ले रायगड येथे A S I तिकीट कक्ष ते होळीचा माळ पदपथ मार्गावर बाजूची झीज होऊन येणारी माती रोखण्यासाठी कमी उंचीची दगडी संरक्षण भिंत बांधणे बैठक व्यवस्था करणे व पद पथाची दुरुस्ती करणे २७२.७३ लक्ष रुपये
६१) किल्ले रायगडावर महादरवाजा ते चित्त दरवाजा ०/३०० ते ०/७०० पदपथ तयार करणे ३००.०० लक्ष रुपये
६२) किल्ले रायगडावर महादरवाजा ते चित्त दरवाजा१/००ते १/३५० पदपथ तयार करणे ३००.०० लक्ष रुपये
६३) बाजारपेठ ते टकमक टोक पदपथ तयार करणे २५०.०० लक्ष रुपये
६४) बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर पदपदाच्या बाजूच्या संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी करणे २८५.०० लक्ष रुपये
६५) पाचाड मोहल्ला स्मशानभूमी व संरक्षण भिंत बांधणे २०.०० लक्ष रुपये
६६) नेवाळी वाडी स्मशानभूमी बांधणे ५.०० लक्ष रुपये
६७) रायगड वाडी स्मशानभूमी बांधणे १०.०० लक्ष रुपये
६८) रायगड वाडी कोळी आव्हाड अंतर्गत रस्ता तयार करणे ५.०० लक्ष रुपये
६९) खर्डी अंतर्गत रस्ता तयार करणे १५.०० लक्ष रुपये
७०) वाळसुरे दत्तवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे २५.०० लक्ष रुपये
७१) शादोशी अमडोशी धनगरवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे २०.०० लक्ष रुपये
७२) कावळे तर्फे नाते अंतर्गत रस्ता तयार करणे २०.०० लक्ष रुपये
७३) किल्ले रायगडावर होळीचा माळ ते चित्त दरवाजा पदपथाची देखभाल दुरुस्ती करणे ६५.०० लक्ष रुपये
७४) वारंगी बौद्धवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे २५.०० लक्ष रुपये
७५) खडकी वाडी ते नेवाळी वाडी रस्ता घाट सुधारणा करणे ७५.०० लक्ष रुपये
७६) देवघर अंतर्गत रस्ता तयार करणे २५.०० लक्ष रुपये
७७) रायगड वाडी बौद्ध वाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे २०.०० लक्ष रुपये
७८) मांग घरून आदिवासी वाडी अंतर्गत रस्ता तयार करणे ३५.०० लक्ष रुपये
७९) मांग घरून येथे सभागृह बांधणे २५.०० लक्ष रुपये
८०) पाने येथे सभागृह बांधणे २५.०० लक्ष रुपये
८१) देवघर येथे सभामंडप बांधणे १०.०० लक्ष रुपये
८२) देवघर अंतर्गत रस्ता तयार करणे २५.०० लक्ष रुपये
८३) बिरवाडी मांगरून वाघेरी रस्ता तयार करणे १३९३.०० लक्ष रुपये
८४) मौजे महाड येथे प्राधिकरण व कार्यकारी अभियंता विशेष पथक रायगड किल्ला यांच्याकरिता कार्यालयाचे बांधकाम करणे ४००.०० लक्ष रुपये
८५) मौजे पाचाड येथे पोलीस चौकी व V I P कक्षाचे बांधकाम करणे ९३.१५ लक्ष रुपये
८६) मौजे पाचाड येथे पोलिसांकरिता धर्म शाळेचे बांधकाम करणे ९९.६२ लक्ष रुपये
८७) खर्डी जोड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ८९.७६ लक्ष रुपये
८८) वारंगी रोड दत्तवाडी जोड रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे १३.९७ लक्ष रुपये
८९) मौजे पाने येथे अंतर्गत रस्ता तयार करणे ५०.१९ लक्ष रुपये
९०) रायगड किल्ल्यावरील हत्तीखाना येथे पोलीस चौकीच बांधकाम करणे ४१.६८ लक्ष रुपये
९१) पाचाड येथील धर्म शाळेची दुरुस्ती करणे व स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे ९४.७५ लक्ष रुपये
९२) रायगड किल्ला यांनी किल्ले रायगडावरील राज सदर येथील S t a t u c ला दगडी पिलर व चेन चे बॅरिकेटिंग चे काम करणे ३.३४ लक्ष रुपये
९३) किल्ले रायगड येथील M T D C वस्तीगृहाची दुरुस्ती करणे ३६६.५१ लक्ष रुपये
९४) किल्ले रायगड येथील M T D C विश्रांती कक्षाची दुरुस्त करणे ३०४.१७ लक्ष रुपये
९५) रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी गंगासागर तलावाजवळील महिलांसाठी स्नानगृहाची दुरुस्ती करणे २.९५ लक्ष रुपये
९६) किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद विश्रामगृहा जवळील महिलांसाठीच्या स्वच्छतागृहात करिता पाण्याची टाकी बसवणे २.११ लक्ष रुपये
९७) पाचाड येथील जिजामाता समाधी जवळील बंधाऱ्याची दुरुस्ती करणे ३.३० लक्ष रुपये
९८) मांगरून गावदेवी मंदिर येथील रस्ता तयार करणे ५४.२० लक्ष रुपये
९९) वाघोली पोटलेवाडी नेवाळेवाडी रायगड रोपवे, रस्त्याचे सर्वेक्षण करणे ५१.७८ लक्ष रुपये
१००) नगर भुवन ते खडकी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे १३८.९७ लक्ष रुपये
१०१) रायगड वाडी ते वाघेरी रस्त्याचे सर्वेक्षण करणे ४१.७० लक्ष रुपये
१०२) वाघोली आदिवासी वाडी रस्ता तयार करणे ४२.७५ लक्ष रुपये
१०३) मांगरून अंतर्गत रस्ता तयार करणे १३१.९२ लक्ष रुपये
१०४) किल्ले रायगडावर पुरातत्व वास्तूचे वैज्ञानिक मार्गाने उत्खनन करणे ११२.०८ लक्ष रुपये
१०५) किल्ले रायगडावरील राज सदर येथील महाराजांच्या वाड्याच्या जोत्याला दगडी पिलर व चैन व बॅरिकेटिंग चे काम करणे ११.७२ लक्ष रुपये
१०६) किल्ले रायगडावरील स्वच्छतागृहाची स्वच्छता व देखभाल करणे १४.३५ लक्ष रुपये
१०७) रायगड विकास प्राधिकरणामार्फत कामांचे दस्तऐवजीकरण करणे १०.०० लक्ष रुपये
१०८) रायगड किल्ल्यावरील खू बलढा बुर्जाची विशेष दुरुस्ती करणे २६.१२ लक्ष रुपये
१०९) नाणे दरवाजा ते राजवाड मार्गावरील मज्जित मोर्चाची विशेष दुरुस्ती करणे ४१.०६ लक्ष रुपये
११०) रायगड किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिराजवळील पागा इमारत क्रमांक १ ची विशेष दुरुस्ती करणे ३१०.९३ लक्ष रुपये
११२) रायगड किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिराजवळील पागा इमारत क्रमांक . २ ची विशेष दुरुस्ती करणे १३६.६० लक्ष रुपये
११३) रायगड किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिराजवळील पागा इमारतीच्या पूर्वेकडील सैनिक निवासस्थान क्रमांक १,२, व ३ ची विशेष दुरुस्ती करणे
२६८.७९ लक्ष रुपये
११४) रायगड किल्ल्यावरील बाजारपेठेच्या पूर्व कडील फुटका तलावाची विशेष दुरुस्ती करणे २९३.७२ लक्ष रुपये
११५) रायगड किल्ल्यावरील तात्पुरत्या स्वरूपाच्या (F R P) प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे १३.०० लक्ष रुपये
११६) रायगड किल्ल्यावरील जिल्हा परिषद विश्रामगृहा जवळील प्रसाधनगृहाची दुरुस्ती करणे ३.४५ लक्ष रुपये
११७) किल्ले रायगडावरील हिरकणी बुरुजा जवळील तलावाची विशेष दुरुस्ती करणे १८८.२४ लक्ष रुपये
११८) रायगड विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती S o c a i l M e d ia मार्फत प्रसिद्ध करणे ३.०० लक्ष रुपये
११९) माननीय मुख्यमंत्री महोदयांकरिता रायगड विकास प्राधिकरणाची A u d i o v i s u a l P r e s at i o n तयार करणे २.९७ लक्ष रुपये
२२०) राज्य मार्ग९७ ते कोंजर जोड रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे १०.५२ लक्ष रुपये
२२१) राज्यमार्ग ९७ ते कोंढरांन जोड रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ५०.७८ लक्ष रुपये
२२२) राज्य मार्ग ९७ ते सादोशी जोड रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ७०.२० लक्ष रुपये
२२३) सावट करमर रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ४८.१० लक्ष रुपये
२२४) ख लई रस्त्याचे मजबुरीकरण डांबरीकरण करणे ४१.२५ लक्ष रुपये
२२५) बांधणीचा माळ ते अमडोशी धनगरवाडी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ३६.१५ लक्ष रुपये
२२६) राज्य मार्ग १०१ ते वारंगी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे २४.३६ लक्ष रुपये
२२७) राज्य मार्ग१०१ ते पंदेरी दापोली रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ६२.७९ लक्ष रुपये
२२८) रायगड वाडी ते टकमकवाडी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ३९.५९ लक्ष रुपये
२२९) रायगड वाडी धनगर वाडी व परडी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ५७.७५ लक्ष रुपये
२३०) हिरकणी वाडी ते रोपवे ते नेवाळी रस्त्याचे मजबुती करण डांबरीकरण करणे ४६.३२ लक्ष रुपये
२३१) पाने ते कडसरी लिंगाणा नवीन वसाहत रस्त्याचे बांधकाम करणे ८४.९६ लक्ष रुपये
२३२) रायगड किल्ला व परिसराची ३ D Mappi ng करणे १,०६,७२,.०० लक्ष रुपये
२३३) रायगड किल्ल्यावर जगदीश्वर मंदिर ते बाजारपेठ दगडी मार्गी का करणे ५९७.०३ लक्ष रुपये
२३४) किल्ले रायगडावर रोपवे अप्पर स्टेशन जवळ A S I टिकोट कक्षाचे बांधकाम करणे ५५.३२ लक्ष रुपये
२३५) किल्ले रायगडावरील जिल्हा परिषद विश्रामगृहाची दुरुस्ती करणे ७२.७१ लक्ष रुपये
२३६) रायगड किल्ल्यावर व जिजामाता वाड्यावर ध्वनी व प्रकाश योजना (L i g h t &S o u n d S h o w) चे काम करणे १६३३.१३ लक्ष रुपये
२३७) रायगड किल्ल्यावरील नळ पाणीपुरवठा योजना करणे १३८.६२ लक्ष रुपये
२३८) रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही मूर्तींच्या (राज सदर व होळीचा माळ) O x i d i s i n g Left
Wa x i n g प्रक्रिया करणे २.४० लक्ष रुपये
२३९) रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची W E B S i T E निर्मिती करणे २,८३,२०० लक्ष रुपये
२४०) रायगड किल्ल्यावर जगदीश्वर मंदिराजवळ पोलीस चौकीचे बांधकाम करणे ३८.०० लक्ष रुपये
२४१) रायगड किल्ल्यावर जगदीश्वर मंदिराजवळ स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे ६३.८२ लक्ष रुपये
२४२) रायगड किल्ल्यावर कोळस तलावाजवळ स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे ६४.७४ लक्ष रुपये
२४३) रायगड किल्ल्यावर महादरवाजा ते हत्ती तलाव पदपथावर स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे ६२.३६ लक्ष रुपये
२४४) नाणे दरवाजा ते मशीद मोर्चा पर्यंतच्या पदपथाचे मजबुतीकरण पायऱ्या ,संरक्षक कठडे, रेलिंग, पाणी वाहून नेण्याची गटारे इत्यादी करणे ५९३.२२ लक्ष रुपये
२४५) चित्त दरवाजा ते महादरवाजा पद पथापैकी महादरवाजा ० ते ३०० मीटर पर्यंतच्या पायऱ्या ,संरक्षक कठडे, रेलिंग ,पाणी वाहून नेण्याची गटारे इत्यादी बनवणे ३८३.८४ लक्ष रुपये
२४६) चित्त दरवाजा ते महादरवाजा पद पथापैकी महादरवाजा ३००ते १३०० मीटर पर्यंतच्या पायऱ्या ,संरक्षक कठडे, रेलिंग ,पाणी वाहून नेण्याची गटारी इत्यादी बनवणे ३६४.०६ लक्ष रुपये
२४७) चित्त दरवाजा ते महादरवाजा पद पथापैकी महादरवाजा१३००ते १८५० मीटर पर्यंतच्या पायऱ्या ,संरक्षक कठडी, रेलिंग ,पाणी वाहून नेण्याची गटारे इत्यादी बनवणे ५१५.२४ लक्ष रुपये
२४८) रायगड किल्ल्यावरील शिवकालीन पाणी साठवून टाका व तलावांमधील गाळ काढणे २२,८१,२०६ लक्ष रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading