किल्ले रायगड वरील शिव समाधीच्या अष्टकोनी चौथर्‍यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी

Raigad Sanadi
महाड (मिलिंद माने) :
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरील अष्टकोनी चौतरावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड येथे दररोज देश विदेशासहित राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त व पर्यटक रायगडावर दररोज भेट देत असतात त्याचप्रमाणे केंद्रातील व राज्यातील मंत्र्यांसहित देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान . मुख्यमंत्री यांच्या सहित वेगवेगळ्या पक्षाचे पक्षप्रमुख यांनी रायगड वर भेट दिली आहे तर अनेकांनी यापूर्वी राजकीय कार्यक्रम देखील रायगडावर केले आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावरील राज दरबारात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात केले होते यावरून मोठ्या प्रमाणावर शरद पवारांसहित त्यांच्या पक्षावर या ठिकाणच्या जागेचा वापर राजकारणासाठी केल्या कारणावरून टीका झाल्या होत्या यानंतर रायगडावर मोठ्या प्रमाणावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड येथील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या आणि सर्व शिवा पाईक यांचे प्रेरणास्थान असलेल्या किल्ले रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या (राज छत्री) अष्टकोनी चौत्रावर करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व महासंचालक नवी दिल्ली येथे लेखी पत्राद्वारे केली आहे.
किल्ले रायगडावर असलेल्या शिवसमाधी येथे विविध कार्यक्रमादरम्यान देश-विदेशातून मान्यवर महाराजांना अभिवादन करण्यास येत असतात पण अनवधनाने, अति उत्साही पणाने हे मान्यवर मूळ समाधीच्या अष्टकोनी चौथर्‍यावर बांधलेल्या छत्री खालील भागावर (मूळ समाधीच्या मध्यभागी उभे राहून) अभिवादन करतात सदर बाब ही पूर्णपणे निंदनीय आणि अशोकनीय तसेच समाधी स्थळाचा अवमान करणारी आहे याबाबतची अनेक छायाचित्र व चित्रफित प्रसिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसमाधी वास्तू ही केंद्रीय संरक्षित स्मारक आहे शिव समाधीचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन भारतीय पुरातत्व विभागाने कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारे वारंवार होत असलेल्या अवमानस्पद गोष्टी लक्षात घेऊन माधी चौथर्‍यावर चढण्यास बंदी घालायला हवी होती पण तसे काही होताना दिसत नाही, कारण पुरातत्त्व विभागाला शिवसमाधी त्या वास्तूचे महत्त्व, शिष्टाचार याचा विसर पडला आहे असा प्रश्न उभा होतो.
शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर राजदरबारात असणाऱ्या अष्टकोनी चौथरा हीच छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ समाधी आहे हे लक्षात घेणे अति महत्त्वाचे आहे. अष्टकोनी चौथरावरील छत्रीचे बांधकाम नव्याने केलेले आहे त्यामुळे अष्टकोनी चौथरावर कोणासही चढण्यास बंदी असावी सदर चौथ्यावर साफसफाई सुशोभीकरण यासाठी जावे लागते त्यासाठी नियम अटी असाव्यात साफसफाई सुशोभीकरण करत असताना छायाचित्र काढण्यात सक्त मनाई असावी असे छायाचित्र कोणत्याही माध्यमातून प्रकाशित झाल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची पुरातत्त्व विभागाच्या नियमात तरतूद असावी तसेच चौथ्याभोवती संरक्षित रेलिंग असावेत याबाबत तातडीने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना लिहिलेल्या लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading