कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण हटवणाऱ्या कारवाईनंतर राज्य सरकारने आता सर्व गड किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर देखील कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
रायगड किल्ल्यावर २४ निवासी घरे आणि ५६ दुकाने अतिक्रमण म्हणून घोषित करून वनविभागाने त्यांना ३० मे २०२५ पर्यंत रिकामे करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईला पुरातत्त्व विभागाचा पाठिंबा आहे. विशेष बाब म्हणजे, रोपवे प्रकल्पाला मात्र यापासून सूट मिळाल्याचे चित्र दिसून येते, ज्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या अतिक्रमणांमध्ये धनगर समाजाची घरे, झुणका भाकर केंद्र, स्टॉल्स, खाद्यपदार्थ व पाणी बाटली विक्रेते यांचा समावेश आहे. हे व्यवसाय महादरवाजापासून ते जगदीश्वर मंदिराच्या पायवाटांवर पसरलेले आहेत. या व्यवसायांना आणि घरांना अनधिकृत ठरवून वनविभागाने स्वखर्चाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात २५ एप्रिल २०२५ रोजी महाड येथील वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. रायगड राखीव वन क्षेत्र क्रमांक ५५० मधील अतिक्रमण कच्च्या स्वरूपाचे असल्याचे निरीक्षणात आले असून, तात्काळ हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रायगड किल्ल्यावरील धनगर समाजाची २४ निवासी घरे आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे:
१) महादेव नथू अवकीरकर, २) बाबू नथू अवकीरकर ३) रायबा भागोजी अवकीरकर ४) श्रीमती सुलोचना गंगाराम महाबले ५) विठ्ठल रहु अवकीरकर ६) रवी भागोजी अवकीरकर ७) श्रीमती जाईबाई देवबा झोरे ८) श्रीमती सखुबाई धोंडीराम शिंदे ९) श्रीमती लीलाबाई धाकटू अवकीरकर १०) सुनील शिंदे ११) चंद्रकांत धाऊ गोरे १२) गंगाराम नारायण उगीरकर १३) संजय विठ्ठल अवकीरकर ही १३निवासी घरे रायगड किल्ल्यावरील असणाऱ्या ऐतिहासिक बाजारपेठे जवळ आहेत
किल्ले रायगडावरील जगदीश्वरा मंदिराजवळ असणारी ८ घरांची नावे पुढीलप्रमाणे; १) किशन नवलू अवकीरकर २) वसंत श्यामा अवकीरकर ३) रामचंद्र अवकीरकर ४) विठ्ठल बाबू अवकीरकर ५) संतोष मारुती शिंदे ६) वसंत धाऊ अवकीरकर ७) मोतीराम धाऊ अवकीरकर ८) बापू भागोजी अवकीरकर
किल्ले रायगडावरील मज्जिद मोर्चा जवळ २ घरे आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे; १) बाबू भागोजी अवकीरकर २) सुरेश भागोजी अवकीरकर
किल्ले रायगडावर जाणाऱ्या वासुरेखिंडीच्या जवळ असणारे एकमेव घर; १) सुरेश बामू अवकीरकर
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील. (होळीच्या माळ) बाजारपेठ ते समाधी स्थळापर्यंत १६ स्टॉल आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे; १) वसंत धाऊ अवकीरकर २) किशन नवलू अवकीरकर ३) बापू भागोजी अवकीरकर ४) वसंत क्षमा अवकीरकर ५) विठ्ठल रहु अवकीरकर ६) संतोष मारुती अवकीरकर ७) संगीता रवी अवकीरकर ८) मंगल संदीप ढवळे ९) चंद्रकांत धाऊ गोरे १०) रायबा भागोजी अवकीरकर व संतोष ढेबे ११) काशीराम नथू अवकीरकर १२) वैशाली महेश बावधने १३) पिंकी गंगाराम अवकीरकर १४) महादेव नथू अवकीरकर १५) सखुबाई धोंडीराम शिंदे १६) सुलोचना गंगाराम महाबले
किल्ले रायगडावरील हत्ती तलाव ते महादरवाजापर्यंत ७ स्टॉल धारकांची नावे पुढीलप्रमाणे; १) सिताराम रामचंद्र अवकीरकर २) हरिश्चंद्र शिंदे ३) राजेश रामचंद्र अवकीरकर ४) संजय विठ्ठल अवकीरकर ५) नीलम विठ्ठल अवकीरकर ६) भागोजी कोकरे ७) शांताराम हिरवे
किल्ले रायगडावरील महादरवाजा ते चित्त दरवाजापर्यंत ३१ स्टॉलधारक आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे; १) दिलीप कोंडीराम आखाडे २) कोंडीराम आखाडे ३) सखुबाई कोकरे ४) संगीता शांताराम हिरवे ५) यशवंत दगडू आखाडे ६) संदीप शिंदे ७) रमेश बाबू ढवळे(राहुल ढवळे) ८) चंद्रकांत कोकरे ९) अक्षय कोकरे १०). गणेश झोरे ११) सिताराम झोरे १२) सुरेश भागोजी अवकीरकर (मनीषा अवकीरकर) १३) भाऊ भागोजी अवकीरकर (सुशीला अवकीरकर) १४) निलेश खातू १५) नीलम ढेबे १६) सुरेश बांबू अवकीरकर १७) राजू होगाडे (भारती होगाडे) १८) रुपेश झोरे १९) राजू शिंदे २०) पप्पू भाऊ ढवळे (भाविका ढवळे) २१) सुमन मारुती जाधव २२) गणेश बळीराम अवकीरकर २३) सुनिता कल्पेश जाधव २४) श्रीमती पार्वती ढवळे २५) श्रीमती कलावती जाधव (सयाजी जाधव) २६) रंजना ढवळे /अनिता अवकीरकर २७) दीपक कोकरे २८) सुनील जाधव २९) सुरेश जाधव ३०) संतोष जाधव ३१) सीमा संदीप जाधव
या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात संभाव्य वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण ६ जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, कोणत्याही संघर्षामुळे ऐतिहासिक सोहळ्यावर परिणाम होऊ नये, अशी शिवभक्तांची आणि पर्यटकांची मागणी आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.