किल्ले रायगडावर पर्यटनासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सदरची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली असून भीमराव अडकुजी घायवन वय वर्ष 64, राहणार उरळी कांचन पुणे, असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गुरुवार 20 मार्च रोजी पुण्याहून 43 भीम अनुयायी महाड चवदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते यानंतर हे सर्व भीम अनुयायी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी गेले असता यातील मयत हे पायऱ्या उतरत असताना अचानक त्यांचा पाय घसरला व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मयत भीमराव घायवन यांनी समता सैनिक दलाचे शिपाई म्हणून अनेक वर्ष काम केले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड रुग्णवाहिका चालक अनंत अवकीरकर यांनी सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. महाड तालुका पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून महाड तालुका पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.