किरण ठाकरे यांचा नामनिर्देशन अर्ज मागे

Kiran Thakare
कर्जत ( गणेश पवार ) : 
माहायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे संर्पक प्रमुख यांनी अपक्ष भरलेला नामनिर्देशन अर्ज भरल्याने महायुतीच्या उमेदवारासमोर थेट अहवान निर्माण झाल्याने या कडे सर्वांचे लक्ष लागले असताना, आज दि. ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने किरण ठाकरे यांनी कर्जत येथील रायलगार्डन येथे पत्रकार परिषद घेत नामनिर्देशन अर्ज मागे घेत असल्याचे जाहिर केले आहे.
यावेळी भाजपाला मित्रपक्षांकडून साथ मिळत नसल्याने, भाजपाचे सर्व कार्यकर्ते एकत्र येत मी पक्षाचा व अपक्ष नामनिर्देशन अर्ज भरावा असा कार्यकर्त्यांच्या अग्र असल्याने मी माझा नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाचे केंद्रीय नेते यांनी पक्षातील ज्यांनी कोणी बंड केला आहे. त्यांनी आपले अर्ज मागे घेण्याचा आदेश असल्याने, राज्यातील नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आज माझा अर्ज मागे घेतला आहे.
गेली सात वर्ष पक्षात काम केले आहे. व ५ वर्षे पक्षाकडे मी कोणतेही पद मागितले नाही. आम्हाला महेंद्र थोरवे आमचे कोणतेही काम करणार नाही, आम्हाला त्रास देतील असे असले तरी पक्षाचा आदेश म्हणून आम्ही महायुतीचे काम करणार, कोणत्या एका व्यक्तीला नाही. पुढे येणाऱ्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका भाजपा स्वबळावर लढवणार असल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले आहे.
या पत्रकार परिषदेला भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य हृषिकेश जोशी, भाजप युवा मोर्चाचे प्रज्ञेष खेडकर, संतोष धुळे, रामदास घरत, जनार्दन म्हसकर, किशोर ठाकरे यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading