कालव्यात तरुणाचा अंत, घातपात की आत्महत्या…? आंबेवाडी कोलाड नाक्यावर एकच खळबळ !

Budane
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
31 मार्च रोजी क्रिकेट बघायला गेलेला तरुण मागे परतलाच नाही, या युवकाचा मृतदेह हा कोलाड परिसरातील पुई गावच्या हद्दीतील कालव्यात सापडल्यामुळे या युवकाचा घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदरील या दुर्दैवी घटनेची खळबळ आंबेवाडी कोलाड परिसरात उडाली आहे.
मौजे कोलाड आंबेवाडी येथील राहणारा उच्च शिक्षित होतकरू तरुण जयेश जयराम परबलकर वय वर्ष (३१) हा युवक रविवारी ३१ मार्च रोजी संभे येथे क्रिकेट सामने बघायला जात आहे असे सांगून घरातून बाहेर निघाला मात्र तो पुन्हा घरी माघारी परतलाच नाही तर शोध घेण्यात आला. यावेळी शोध घेत असताना तो सोमवारी 1 एप्रिल रोजी त्याची स्कटी पुई नजिक आसलेल्या कालवा रस्तावर तद्नंतर दुपारच्या वेळी कोलाड पुई नजिक च्या कालव्यात मृतदेह अवस्थेत वाहत्या पाण्यात सापडला त्यामुळे त्याच्या या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य काय हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदरच्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस निरिक्षक नितीन मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली तर याबाबत कोलाड पोलीसांकडून मिळालेले माहिती अशी की, हकिगत वरील तारखेस वेळी व ठिकाणी यांतील मयत हा दिनांक ३१/ ०३ /२०२४ रोजी फर्यादी यांना सांगीतले की, मी संभे येथे क्रिकेट बघण्यासाठी जातो असे सांगुन गेला तो सकाळपर्यंत घरी आला नसल्याने त्याला शोधत असताना मयत याची स्कुटी नं एम एच ०६, सीई २८४७ हि पुई गावचे हददीत कॅनलच्या बाजुला मिळुन आल्याने त्याचा शोध घेतला असता त्याचे प्रेत कालव्याच्या वाहत्या पाण्यामध्ये मिळुन आला आहे.
विगलंबाचे कारण निरंक असल्याची माहिती मिळाली .अ.मृ घडला ता.वेळ ठिकाण दिनांक ०१/०४/२०२४ रोजी ००-३० ते १२.३० वा चे दरम्यान मौजे पुई गावचे हददीत हददीत कॅनलच्या वाहत्या पाण्यात अ.मृ दाखल ता.वेळ दिनांक ०१/०४/२०२४ रोजी १४-४८ वा.अ.मृत रजि.नं.व ०६/२०२४ कलम-सिआरपीस कलम१७४ प्रमाणे पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading