कायदा, सुव्यवस्थेसाठी मांडवा सागरी पोलिसांचा रूट मार्च

कायदा, सुव्यवस्थेसाठी मांडवा सागरी पोलिसांचा रूट मार्च
सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :
आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाण्यातर्फे चोंढी व झिराड येथे गुरुवार दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून ते ६ वाजेपर्यंत रुटमार्च काढण्यात आले.
 आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मांडवा सागरी पोलीस सज्ज झाले असून निवडणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच आचारसंहितेचा भंग होऊ नये व विधानसभा निवडणुका निर्विवाद आणि शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झिराड येथे मांडवा पोलीस ठाणे ते पाटील पोल्ट्री – बाजार पेठ – वैभव हॉटेल – स्टेट बॅंक तसेच चोंढी येथे चोंढी नाका – अपना बाजार – रेल्वे फाटक – मुख्य बाजारपेठ – चोंढी पूल याठिकाणी पद पथसंचलन(रूटमार्च) करण्यात आले.
सदर रूटमार्च वेळी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे ०२ अधिकारी, १० अंमलदार तसेच सीआयएसफ चे ४६ जवान उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading