कामोठे पोलीस ठाण्याची जबरदस्त कामगिरी! हरवलेले ४२ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

Kamothe police

पनवेल :

कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले विविध कंपन्यांचे तब्बल ४२ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. ही यशस्वी कारवाई परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते पार पडला. या मोबाईल्सची एकूण किंमत ₹७,७३,००० इतकी आहे.
ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोलीस हवालदार झोळ, पोलीस शिपाई कोकाटे, इलग आणि गायकवाड यांच्या पथकाने सीईआयआर (CEIR) पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पार पाडली. विविध राज्यांतून हे मोबाईल शोधून काढण्यात आले.
मंगळवारी मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. या यशस्वी मोहिमेमुळे कामोठे पोलीस ठाण्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.
पोलीस आयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी कामगिरीबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading