न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटना (NMKG) गेल्या २० वर्षांपासून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी रात्रंदिवस लढत आहे. जागतिक पातळीवरील शिपिंग कंपनी मर्क्स, डी. पी. वर्ल्ड, पीएसए सिंगापूर, अदानी ग्रुप येथील कामगारांना संघटित करून सेवा-शर्तींच्या अधिन राहून चांगले वेतनवाढीचे करार केलेले आहेत. भारतातील आयटीएफ सलग्न सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रात कामगारांना संघटित करावे त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास, आयटीएफची पूर्ण ताकद कामगारांच्या मागे लावण्यास मी आयटीएफ या बहुराष्ट्रीय संघाचा एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणूनआपणांस आश्वासित करत आहे असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले. मुंबई येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हाॅटेलमध्ये झालेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) संघटनेच्या संलग्न संघटनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आयटीएफचे जनरल सेक्रेटरी स्टिफन काॅटन, एनयूएसआयचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदाळगावकर,एमयूआयचे कॅप्टन प्रधान तसेच भारतातील आय टी एफ संलग्न संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पुढील पाच वर्षांसाठी कामाची रूपरेषा ठरविण्यासाठी चर्चा झाली. या बैठकीला स्टिफन काॅटन यांनी विशेष मार्गदर्शन केले.
मोरोक्कोमध्ये झालेल्या २०२४ च्या जागतिक अधिवेशनात भारतातून पहिल्यांदाच महेंद्रशेठ घरत हे आयटीएफचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून निवडून आल्याबद्दल आयटीएफचे जनरल सेक्रेटरी स्टिफन काॅटन यांनी अभिनंदन केले. त्यांच्या कामाचे, निर्भीड वक्तृत्वाचे कौतुक करून महेंद्रशेठ घरत यांना पुढील वाटचालीसाठी स्टिफन यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्टिफन काॅटन यांचा पुणेरी टोपी आणि भव्य पुष्पहार देऊन महेंद्रशेठ घरत यांनी सत्कार केला. त्यावेळी भारतात झालेल्या या सत्काराबद्दल काॅटन यांच्या चेहऱ्यावर अत्यानंद दिसत होता.
सर्वंच क्षेत्रांत खासगीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. एआय तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात कामगारांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मात्र जागतिक उद्योजक भारताकडे आकर्षित होत आहेत, भारत महान वैश्विक शक्ती होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. अशावेळी कामगार मूलभूत अधिकारांपासून वंचित राहाता कामा नयेत, सरकारला कामगारांसंबधात सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू, केंद्रीय 12 संघटना एकत्र येऊन रननिती आखावी असेही महेंद्रशेठ घरत म्हणाले. न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रामण म्हणाले, जागतिक पातळीवरील मर्क्स ही कंपनी अनेक देशांत ट्रान्सपोर्ट कामगारांचे शोषण केले जाते, त्याविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या मागे आयटीएफने अभियान उभे करायला हवे, असा ठराव आयटीएफच्या २०२४ मध्ये मोरोक्कोमध्ये झालेल्या जागतिक अधिवेशनात करून पास केला आहे, परंतु ॲक्शन घेऊन अंमलबजावणी झालेली नाही त्याचा खुलासा करावा असा प्रश्न उपस्थित केला. आयटीएफचे दिल्ली येथे क्षेत्रिय कार्यालय आहेएशिया पॅसीफिक रिजनल सेक्रेटरी ची जागा रिकामी आहे ती तातडीने भरावी जेणेकरून आयटीएफच्या कामाला गती येईल आणि ते अधिक जोमाने होईल, अशीही मागणी पी. के. रामण यांनी या बैठकीत केली.
या बैठकीचे आयोजन नॅशनल युनियन ऑफ सी-फेररर्स ऑफ इंडिया, मॅरिटाईम युनियन ऑफ इंडियाने (MUI) यांनी केले होते.
या बैठकीला न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, लंकेश ठाकूर, आनंद ठाकूर, अरुण म्हात्रे,तसेच इतर संघटनाचे पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.