
उरण ( विठ्ठल ममताबादे ) :
भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत “गाव तेथे काँग्रेस” हा संकल्प काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी सुरू केला असून, याची सुरुवात दिघोडे गावातून झाली आहे. बुधवारी (दि. 18) भेंडखळ गावात या संकल्पाचा दुसरा टप्पा सुरू झाला.
या वेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य मिलिंद पाडगावकर,जे.डी.जोशी, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, उरण तालुका युवक अध्यक्ष लंकेश ठाकूर,माजी शहराध्यक्ष किरिट पाटील,श्रीयश घरत,विधणे विभाग अध्यक्ष बी एन ठाकूर, काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस अश्विन कैलास थळी, महिला अध्यक्षा रेखा घरत,इंटक जिल्हा उपाध्यक्षा विनया पाटील, वैभव पाटील, नरेश कडू, ध्रुव जयवंत पाटील,साहिल पाटील, तेजस तांडेल, एकनाथ घरत, प्रेमनाथ ठाकूर,रोहित घरत, काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष घनश्याम पाटील, राजेंद्र भगत, वैभव पाटील, किरण कुंभार सह काँग्रेस पक्षाचे गाव अध्यक्ष तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महेंद्र शेठ घरत यांनी सांगितले की, काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे, त्यामुळे काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांच्या मनात रुजली आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांनी भूमीपुत्रांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्यांच्या नावाने नवी मुंबई विमानतळाचे नामकरण करणे प्रकल्पग्रस्तांचे काम आहे. यावेळी उरण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांत काँग्रेस नामफलक अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार घनश्याम कडू यांनी उरणकरांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली.