कशेडी घाटात दरीच्या कडेला सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?

Kashedi ghat police
पोलादपूर (शैलेश पालकर) :
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात, भोगाव गावाच्या हद्दीत जुन्या महामार्गालगत असलेल्या दरीच्या बाजूला एक बेवारस मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचा अज्ञात पुरुष असून मृतदेह संरक्षक कठड्यालगत आढळून आला आहे.
याबाबतची माहिती भोगाव गावच्या पोलीस पाटील शुभांगी राकेश उतेकर यांनी पोलादपूर पोलीस ठाण्याला दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार आर. के. सर्णेकर, संग्राम बामणे, तुषार सुतार आणि सौरव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
प्राथमिक तपासणीत आढळले की मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असून उन्हामुळे काळवंडला होता आणि परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. या घटनेमुळे आत्महत्या की घातपात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलादपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading