कलश इंटरटेनमेंट तर्फे अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२५ हा सोहळा श्लोक पाटील व कल्पना सुर्वे यांच्या संकल्पनेतून त्यांनी साकारलेल्या या सन्मान पुरस्काराचे वितरण मोठ्या जल्लोषात साजरे झाले. उरण मधील सिल्वर ओक रिसॉर्ट येथे शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे, शैलजा घरत, राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर व माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर महिलाही उपस्थित होत्या.आलेल्या मान्यवरांचे लेझीम च्या गजरात स्वागत झाले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्लोक पाटील आणि कल्पना सुर्वे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी महिलांचा केलेला हा गौरव आहे, त्यांच्या जीवनात आनंदी क्षण दिले आहेत. महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची पोचपावती, त्यांना प्रोत्साहन,तसेच इतर महिलांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, प्रत्येक महिलेला तिच्यात असलेल्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊन, त्यांना गौरवीत करणे, या उदात्त हेतूने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नारी आता अबला नाही तर ती आता प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन त्या क्षेत्रात नावलौकिक कलावंत आहे. आज ती उंबरठ्याच्या बाहेर येऊन स्वताला सिद्ध करत आहे. येथील या कर्तुत्ववान महिलांना भेटून आनंद झाला आहे. उरण मधील एवढ्या महिलांची माझी ओळख होत आहे हे मी माझे भाग्य समजते. शैलजा घरत यांनीही आपल्या मनोगतात महिलांचे मनोबल वाढविले. कोणत्याही शुभकार्यात कलश मांगल्य जपण्याचे शुभ प्रतीक आहे.पाण्याने भरलेला कलश त्यावर कल्पवृक्ष हे आपल्या संस्कृतीचे पावित्र्य आहे. त्यामुळे असा कलश सन्मानचिन्ह म्हणून देऊन प्रत्येक महिलेला आठवणीत रहाणारी हि अमुल्य भेट आहे.असे मनोगत शैलजा घरत यांनी व्यक्त केले.सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र एक सुंदर रोपट व देऊन यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण २३ महिलांना गौरवण्यात आले. गौरवीत महिलांनी या सोहळ्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. व सर्वांचे आभार मानले. कलश इंटरटेनमेंटच्या संस्थापक श्लोक पाटील व सहसंस्थापक कल्पना सुर्वे या म्हणाल्या की, हा आमचा दुसरा सीजन आहे आम्ही दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित करणार ,जास्तीत जास्त महिलांना या सन्मानास पात्र बनवणार.
यावेळी लोकशाही, आयबीएन लोकमत, झी 24 तास यासारखे प्रसिद्ध वाहिन्यांचे प्रतिनिधी हजर होते. विविध वृत्तपत्राचे पत्रकार, डॉक्टर्स, विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. शेकापच्या प्रितम म्हात्रे यांनीही यावेळी आपली उपस्थिती दर्शविली. व महिलांना प्रोत्साहन दिले.यावेळी आलेल्या पाहुण्यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. जे. एस. के. ग्रुपने डान्स सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचप्रमाणे लावणी सम्राट अश्मिक कामथे यांनी लावणींची अदाकारी सादर करून टाळ्यांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शेट्टी यांनी रंगतदार आणि सुंदररीत्या केले. आभाराच्या सुमनांची उधळण होऊन ,कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी मुख्य समन्वयक व गिफ्ट पार्टनर स्वप्ना महाडिक, आरती ढोले व्हेन्यु पार्टनर व बाकी सहकारी यांचे योगदान फार मोलाचे आणि मोठे आहे.यां सर्वांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
कलश इंनटरट्रेंमेंट तर्फे अस्तीत्व नारी सन्मान च्या पुरस्कार कर्त्यांची नावे पुढीलप्रमाणे ;- १)तृप्ती भोईर (बेस्ट जर्नालिस्ट) २)संगीता ढेरे (सामाजिक कार्य) ३) मंजिरी प्रभुलकर (रांगोळी कलाकार) ४)निवेदिता मोरे (मेकअप आर्टिस्ट) ५)मानसी कदम (वैद्यकीय सेवा) ६)अनु पाटील (स्वयंसहायता बचत गट) ७)दया परदेशी (गर्भसंस्कार आणि आयुर्वेद) ८)उमा अहुजा (बाल शिक्षण आणि समाज कल्याण) ९) सोमिया सिंग (रायझिंग इंडस्ट्री) १०)रचना चक्रवर्ती (शैक्षणिक) ११)विजया तायडे (सोसायटी रजिस्ट्रेशन ) १२)चैताली म्हात्रे (बेस्ट टीचर) १३)ममता मोरे (ब्युटी इंटरप्रिंनीयर) १४)वनिता पाटील (बेस्ट कोरिओग्राफर) १५)प्रतिभा पाटील (सोशल आयकॉन) १६)संगीता साळुंखे (आध्यात्मिक सेवा) १७)कल्याणी ठाकूर (एस्पीरिंग इंटरप्रिनीयर) १८) वर्षा कुडव (आयुर्वेद) १९)संगीता जाधव (सामाजिक कार्य ) २०)आकांक्षा भोईर (बेस्ट सिंगर) २१)सविता डेरे (वैद्यकीय सेवा) २२)स्वाती ठक्कर ( ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर) २३)प्रीती मेहता (सेलिंग बिझनेस मॉडेल )
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.