पेण – पनवेल मार्गावर भीषण अपघाताची घटना दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे. ठाण्यावरून वडखळ कडे जाणाऱ्या एका SX 4 कारला भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत असून कंटेनर थेट कार वरच पलटी झाला.
पनवेल पोलीस स्टेशन हद्दीत कर्नाळामध्ये ही दुर्घटना घडली असून या कार मधील दोघांपैकी पुरुषाचा मृत्यू झाला असून महिला गंभीररित्या जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त मिळत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले. हायड्राच्या सहाय्याने गाडीवरील पळटलेला कंटेनर बाजूला काढण्यात आला.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार SX 4 कार मध्ये असलेले पल्लवी जोशी या कार मालक ड्रायव्हर जगदीश हाजरा यांच्या सोबत ठाण्याहून वडखळ कडे जात होते. ते कर्नाळा खिंडीत आले असता भरता वेगात येणाऱ्या कंटेनर ने गाडीला जोरदार धडक देत गाडीवरच पलटी झाला. या अपघाताची भीषणता गाडीची अवस्था पाहूनच लक्षात येते. SX4 गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालक जगदीश हाजरा यांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागलेत. तर पल्लवी जोशी या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.