कर्जत हदरल ! घरात बाप्पा विराजमान, जवळील ओहोळात सापडलं मुलासह आई बाबाचा मृतदेह, तिहेरी हत्याकांड की आत्महत्या?

Karjat Hatya Kand
कर्जत ( गणेश पवार ) : 
नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे चिकन पाडा येथे राहाणार ३५ वर्षीय तरुण मदन पाटील व त्याची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील तसेच मुलगा विनायक मदन पाटील यांचा मृत देह घराजवळ असलेल्या ओहळा मध्ये सापडल्याची घटना समोर आली असुन, सदर घटनेची माहिती नेरळ पोलीस ठाण्यात मिळताच लागलीच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह पोलीस टीम घटना स्थळी जाऊन घटना स्थळाची पाहणी करून व पंचनामा करून सदर मृतदेह हे शवविच्छेदनासाठी मुंबई येथीत जे जे रूग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सुत्राकडून समजले आहे. 
चिकन पाडा येथील पत्ती, पत्नी व मुलगा यांचे मृतदेह हे घराजवळ असलेल्या ओहळात सापडून आल्याने, व तीनही मृतदेहांवरील जखमा पाहात ही अज्ञातांकडून हत्या? की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित होत असुन, सदर घटनेचा अधिक तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांची पोलीस टीम ही करीत आहेत.. तर ऐन गणेशोत्सवामध्ये हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित करणारी घटना घडली असल्याने, संपूर्ण कर्जत तालुका हादरला आहे..
कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील चिकन पाडा येथील पोशिर नदी वरती दसपिंडाच्या विधीसाठी सकाळचे १० वाजण्याचे सुमारास ग्रामस्थ जात असताना त्या ग्रामस्थांना पोशिर नदीला मिळणाऱ्या ओहळामध्ये एका ८ वर्षीय लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसुन आल्याने, सदर मुलाचा मृतदेह हा त्याच्या घरी आणला असता, घरात गणपती बापाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली असल्याचे परंतू घरात त्या मुलाचे आई वडिल दिसत नसल्याने, त्यांना फोन केला असता, त्यांचे मोबाईल फोन हे घरात सापडून आले मात्र आई वडिल घरात सापडून आले नसल्याने आई वडिलांनी मुलाला मारून आत्महत्या केली आहे का? असा संशय ग्रामस्थांना उपस्थित झाल्याने घराशेजारी असलेल्या ओहळामध्ये शोध घेतला असता, ज्या ठिकाणी लाहान मुलाचा मृतदेह सापडला होता त्या परिसरात काही अंतरावर एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत त्याची आईचा मृतदेह व वडिलांचा ही जवळ पास पाण्यावर तरंगत असलेल्या आवस्थेत सापडून आला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. 
आईच्या डोक्यावर मुलगा याचे पाठीवर व वडिलांच्या डोक्यावर जखमा दिसून आल्याने सदर घटनेची माहिती ही नेरळ पोलीस ठाण्याला कळवताच लागलीच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह पोलीस टीम घटना स्थळी जाऊन घटना स्थळाची पाहणी करून सदर मृतदेह हे कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले असुन, पंचनामा झाल्यानंतर सदर तीनही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी मुंबई येथीत जे जे रूग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सुत्राकडून समजले आहे.
चिकन पाडा येथील घटनेची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळताच व घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी व त्यांच्या सह पेण उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे यांनी घटना स्थळाला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली आहे. 
चिकन पाडा येथील पत्ती मदन जैतू पाटील ३५ वर्षीय, पत्नी ७ महिन्याची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील अंदाजे वय३०,व मुलगा विनायक मदन पाटील वय अंदाजे वर्ष ८ यांचे मृतदेह हे घराजवळ असलेल्या ओहळात सापडून आल्याने, व तीनही मृतदेहांवरील जखमा पाहात ही अज्ञातांकडून हत्या? की आत्महत्या? असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित होत असुन, या घटनेचा अधिक तपास हा रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे व कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनारवाली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांची पोलीस टीम ही करीत आहेत. 
ऐन गणेशोत्सवामध्ये तिहेरी हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित करणारी घटना पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील चिकन पाडा येते घडली असल्याने, संपूर्ण कर्जत तालुका हादरला आहे. तर पत्नी अनिशा मदन पाटील अंदाजे वय३० ही सात महिन्याची गरोदर असल्याने तीच्या गर्भात वाढणाऱ्या निष्पाप अब्रुकाचा जन्माला येण्या आधी त्या अब्रकाचे जिवन सपले असल्याने मात्र संपूर्ण कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading