कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील विविध समस्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या कर्जत शहर बचाव समितीने आज सोमवार, ७ एप्रिल २०२५ रोजी नगरपरिषदेच्या नव्याने नियुक्त मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत समितीच्या वतीने स्थानिक समस्या मांडत त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
या विशेष सभेत नगर परिषदेचे अभियंता रवी लाड,उपअभियंता मनीष गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. समितीच्या वतीने ॲड. कैलास मोरे यांनी मुख्याधिकारी चव्हाण यांचे स्वागत करत निवेदनातील समस्या सविस्तरपणे मांडल्या.बैठकीत बाजारपेठेतील वाहतूक,भटके कुत्रे,गटार व रस्त्यांची कामे, पाणी व वीजपुरवठा, कर्मचारी निष्काळजीपणा, गुन्हेगारी प्रवृत्ती यासारख्या विविध प्रश्नांवर नागरिकांनी रोखठोक भूमिका मांडली.
दीपक बेहरे यांनी बाजारपेठेतील अडचणी सांगत अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावे असा सल्ला दिला.विजय हरिश्चंद्र यांनी भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला.अजय वर्धावे यांनी धापया मंदिर परिसरातील रेंगाळलेली कामे व स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला.
भाऊ खानविलकर यांनी मुख्याधिकारींना कोणत्याही राजकीय दबावाखाली काम न करण्याचा सल्ला दिला. माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी नगरपरिषद कारभारावर टीका केली. सोमनाथ पालकर यांनी अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची मागणी केली. कृष्णा घाडगे यांनी पाणी व वीज समस्यांवर संताप व्यक्त केला.
————————————————–
“शहरातील मांडलेल्या समस्या प्रशासनाशी सुसंवाद साधून सोडवण्याचा मी प्रयत्न करीन.नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांवर खरं उतरण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करीन.”
…..तानाजी चव्हाण, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद
————————————————–
मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना शहरी समस्येबाबत निवेदन निवेदन दिले आहे. समितीने एक महिन्याची मुदत दिली असून, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास पुढील टप्प्यात आंदोलन जाहीर करण्यात येईल.
..ॲड. कैलास मोरे, कर्जत शहर बचाव समिती.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.