कर्जत घाट भागातील रेल्वे मार्गावर इंजिन घासण्यामुळे वेळ वाया जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत ते लोणावळा दरम्यान नवीन टनेल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 2100 कोटी रुपयांचा विकास आराखडा (DPR) तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच या आराखड्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
मुंबई रेल्वे विभागाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत बारणे यांनी विविध स्थानकांच्या विकासावर भर दिला. कर्जत रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, ओव्हरब्रिजच्या कामाला गती देण्यात येईल. खोपोली येथे पर्यटन वाढत असल्याने तेथील स्थानकाचा विकास होणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकाचे मॉडेल स्टेशनमध्ये रूपांतर होणार आहे.
दिवा ते उरण लोकल सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या 21 भुयारी मार्गाचे काम सुरू असून, त्याला गती देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. काही स्थानके सिडकोने उभारली असून, त्यांच्या देखभालीची जबाबदारी सिडकोकडे आहे. मात्र, ही स्थानके रेल्वेने ताब्यात घ्यावीत, अशी शिफारस करण्यात आली आहे.
कर्जत, नेरळ, लोणावळा स्थानकांवर सरकते जिने, लिफ्ट, पाणी व स्वच्छतागृहाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी झाली. तसेच, कोरोना काळात बंद झालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत, अशी सूचना खासदारांनी केली. माथेरान-अमनलोज ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणीही पुढे आली.
“रेल्वे संदर्भातील रखडलेली सर्व कामे पुढील वर्षभरात मार्गी लागतील. निधीची कमतरता भासणार नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे,” असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पार पडलेल्या या बैठकीत महाप्रबंधक धर्मवीर मीना यांना विविध सूचनाही देण्यात आल्या.
या बैठकीत खासदार नरेशजी म्हस्के, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार चंद्रकांतजी हंडोरे, खासदार धैर्यशीलजी मोहिते, रल्वे महाप्रबंधक मुंबई धर्म वीरजी मीना, मध्य रेल प्रबंधक हिरेशजी मीना, उपमहाप्रबंधक मुंबई के. के. मिश्रा, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त सुरेंद्र नाथ चौधरी, प्रधान मुख्य परिमंडळ प्रबंधक श्याम सुंदर गुप्ता, प्रधान मुख्य अभियंतता रजनीश मथुर, मुख्य अभियंता निर्माण एन टी पी दिव्याकांत चंद्रकार, प्रधान मुख्य विद्युत अभियंता अनुप कुमार अग्रावर, उपस्थित होते
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.