कर्जत तालुक्यात पडलेल्या खड्यमूळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तालुक्यातील नागरीकांना वाहनांमधून होडीच्या प्रवसाचा आनुभव घ्यावा लागत अल्याने नाकी नऊ येत आहे. तर अनेकाना पाठीचे मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. गाव खेड्यातील रस्त्याकडे बांधकाम विभागाचे लक्ष नसल्याचे, तसेच राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्ड्यमूळ नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.
सध्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून खडीमिश्रणाने रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरु आहे. तर कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या खडड्यामुळे रस्त्याची दयनीय दुरावस्था झाली आहे. मात्र याबाबत एम एस सी आर डी ए विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे. तर याच कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील खडड्यामुळे कर्जत येथे अनेक वर्षे रोलर भाडयाने देण्याचा व्यवसाय करणारे महमद हरुन वय ४५ वर्ष हे रविवारी दिनांक १० डिसेंबरला रोजी रोलर ड्रायव्हर यांना कशेळे येथून कर्जत येथे घेऊन जात असताना, पेज नदी पुलाच्या पुढील आदिवासी वाडी पुलाचीवाडी येथील खड्ड्यात त्यांची मोटरसायकल आपटून त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला होता. गाडीवरून आपटल्याने हरुन यांच्या डोक्याला जबरी मार लागल्याने, त्यानां पंधरा दिवस हॉस्पिट्ल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची तब्येत जास्त खालावल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आठ दिवस उपचार चालू असताना, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
खड्डे न बुजवल्याने हरुन कुटुंबीय यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. तर हरून यांच्या सारख्या निष्पाप वाहनचालकांना मृत्यूला सामोरे जाण्याच्या घटना घडल्या परंतु गेंडयाची कातडी असलेल्या एम एमआर डी ए चे अधिकारी यांचे रस्ता दुरुस्ती कडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने, सदर अपघाता संदर्भात एमएमआरडीएच्या अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुढे येत आहे.
कर्जत कशेळे मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्याच्या मध्यभागी भलेमोठे खड्याचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे वाहन चालकांना खड्यातून वाट चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासह या रस्त्यावर मध्यमागी पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होऊन वित्तहानी व जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कशेळे कर्जत मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावरून वाहतुकीसाठी ग्रामीण भागातील अनेक गावांचा नित्याचा संपर्क आहे तसेच हा रस्ता व्यवसायिक अवजड वाहनांना महामार्गाशी जोडण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे. त्यामळे सदर रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुसाट सुरु असते. रस्त्यावर मध्यमागी पडलेल्या भल्यामोठ्या खड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
मात्र याबाबत एमएसआरडी यांचा पुरता दुर्लक्ष होत असून संबधित प्रशासन गाढ झोपेत आहे.दरम्यान या मार्गावरील खड्डे चुकवताना मोठा अपघात झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एम एस आर डी ए विभाग राहणार असल्याच्या प्रतिक्रिया या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून उमटत असून, कर्जत कशेळे मुरबाड रस्त्यावरील खड्डे भरून वाहन चालकांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी येथील नागरीकांमधून जोर धरु लागली आहे.
कर्जत मुरबाड रस्त्यावरील कशेळे सरकारी दवाखान्याच्या समोर,पेज नदिवरील खड्डा वंजारवाडी पुलाचीवाडी येथील रस्त्याच्या मध्यमागी पडलेले खड्डे बुजवून वाहन चालकांना दिलासा द्यावा जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर होईल तसेच खड्डे भरून मोठ्या अपघाताची घटना घडण्यापासूनचा अनर्थ टाळावा असे वाहन चालकांकडून तसेच नागरीकांना कडून बोलले जात आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.