मुरबाड तालुक्यातील वडाचीवाडी येथील काही कामगार १७ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी कर्जत सालोख येथून आपल्या घरी मोटारसायकलने परतत असताना भीषण अपघात झाला.
कर्जत-मुरबाड राज्यमहामार्गावरील भागूचीवाडी येथील वळणावर मुरबाडकडून कर्जतच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ब्रीझा कार (क्रमांक MH-05 FG-0331) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तीन दुचाकींना जोरदार धडक बसली. या अपघातात धनाजी हनुमंत सोंगाळ (वय ३०) यांचा मृत्यू झाला, तर विष्णू हरी सोंगाळ, विजय मोतीराम मेंगाळ आणि मालु बाबू मेंगाळ हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर जखमींना कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान धनाजी सोंगाळ यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात ब्रीझा कार चालक शैलेष दशरथ देशमुख (रा. जडई, ता. मुरबाड, जि. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.