कर्जत मुख्य चारफाटा येथील असलेल्या सर्कल भागात तसेच चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असुन, येथे पडलेल्या मोठमोठया खड्डयांतून कर्जतमध्ये येणाऱ्या पर्यटकांना तसेच इतर वाहचालकांना प्रवास कारावा लागत आहे. या खड्डेमय रस्त्यावरून संबंधित विभागाचे अधिकारीवर्गासह लोकप्रतिनिधी देखील प्रवास करीत आहेत.
कर्जतमध्ये येणाऱ्या पर्यटकांना, व कर्जत तालुक्यातील वाहनचालकाला होणाऱ्या त्रासाचा मात्र याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या संबंधित विभागाचे अधिकारीवर्ग तसेच कर्जत – खालापूरचे लोकप्रतिनिधी तथा आमदार यांना विसर पडला असल्याने, कर्जत मुख्य चार फाट्यावर करदात्या वाहनचालकांचे प्रशासनाकडून खड्डयांतून स्वागत केले जात असल्याची वेळ कर्जतमध्ये येणाऱ्या पर्यटकांन सह इतर वाहनचालकांवर म्हणण्याची वेळ आली आहे.
कर्जत तालुक्यात पर्यटन स्थळ असलेले जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान व तालुक्यात असलेले गड, लेण्या तसेच फार्म हाऊस पाहाता येथे पर्यटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र कर्जत मुख्य चारफाटा या ठिकाणी असलेले सर्कल तसेच कर्जत चौक, कर्जत मुरबाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे, कर्जतमध्ये पुणे व मुंबई सारख्या ठिकाणातून फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तसेच तालुक्यातील इतर वाहनचालकांना या खड्ड्यातून त्रास दायक प्रवास सहन करावा लागत आहे.
या खड्डयांचा अवजड वाहनचालकांना देखील मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तर या पडलेल्या खड्डयांमुळे ट्रॅफिक जामच्या समस्यांना ही सामोरे जावे लागत आहे. तर हे खड्डे भरण्यासाठी संबंधित विभागांकडे पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद आरक्षी पोलिस फ्रेंड असोसिएशन च्या वतीने निवेदन ही देण्यात आले आहे.
मात्र खड्डे जैसे असल्याने व याच रस्त्यावरून प्रवास रोजचा प्रवास हा संबंधित विभागाचे अधिकारीवर्ग तसेच कर्जत – रवालापूरचे लोकप्रतिनिधी तथा आमदार हे देखील करीत असल्याने, मात्र हे खड्डे भरले जात नसल्याने मात्र संबंधित विभागाचे अधिकारीवर्ग व कर्जत – रवालापूरचे लोकप्रतिनिधी तथा आमदार यांना विसर पडला असल्याने, कर्जत मुख्य चार फाट्यावर करदात्या वाहनचालकांचे प्रशासनाकडून खड्डयांतून स्वागत केले जात असल्याची वेळ कर्जतमध्ये येणाऱ्या पर्यटकांन सह इतर वाहनचालकांवर म्हणण्याची वेळ आली आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.