कर्जत तालुक्यातील बालसुधारगृहात राहणारा राजन सुनील चव्हाण (वय १३ वर्षे) हा मुलगा दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ५:४५ वाजण्याच्या सुमारास बालसुधारगृहातून अचानक बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात तातडीने FIR नोंदवण्यात आली आहे.
बेपत्ता मुलाच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी या मुलाबाबत कोणतीही माहिती आढळल्यास तात्काळ कर्जत पोलीस स्टेशनचे PSI जयवंत वारा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक – 9209647572.
राजन चव्हाण याची माहिती मिळाल्यास अथवा तो कोणाला दिसल्यास त्वरीत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.