कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील येणाऱ्या वरणे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या कल्पतरू हा मोठा गृहप्रकल्पात अपंग असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप तसेच सीमाबंदी कामावर आक्षेप घेत कर्जत – रवालापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या समोर झोपून आंदोलन सुरू केले आहे.
कर्जत – रवालापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे समोर झोपून आंदोलन छेडल्याने मात्र परिसरात व कर्जत पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. तर माजी आमदार सुरेश लाड यांचे हे आंदोलन सीमाबंदीच्या कामावर आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सुरू करण्यात आले आहे.
यावेळी कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचे काम सुरू असल्याचे तसेच, शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा व वरणे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या कल्पतरू गृहप्रकल्पात अपंग असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप माजी आमदार तथा भाजपा जेष्ठ नेते सुरेश लाड यांनी केला आहे.
या आंदोलना प्रसंगी माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली आहे. त्यांनी विविध प्रकरणांमध्ये पदाच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तर शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेरच माजी आमदार सुरेश लाड यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलना ठिकाणी त्यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील आदी मान्यवर देखील सहभागी झाले आहेत. या माजी आमदार लाडांच्या आंदोलना प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी डी डी टेळे हे सुद्धा आंदोलना ठिकाणी स्वःता तळ ठोकून आहेत.
या आंदोलन प्रसंगी कल्पतरू गृहप्रकल्पातील शेतकऱ्यांवर दबावाचा आरोप तसेच कल्पतरू प्रकल्पातील अपंग शेतकऱ्यांवर अन्याय व त्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप तसेच कल्पतरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी. तसेच शेतकऱ्यांना वेळ द्यावी व तातडीने अतिक्रमण थांबवावे. व वर्णे गावातील शेतकरी पांडुरंग शिर्के यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित करत हे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी असल्याचे व हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार माजी आमदार तथा भाजपा जेष्ठ नेते सुरेश लाड यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.