
कर्जत ( गणेश पवार ) :
गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाला कर्जत पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. कर्जत कल्याण राज्य मार्गावरील कोषाणे येथे टी.व्ही.एस स्कुटी वरून जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले असता, यावेळी एक तरुण पळून गेल्याने पोलिसांना आलेला संशय यामुळे दुचाकी तपासली असता पोलिसांना वाहनाच्या डिकीत बंद प्लास्टिक पॅकेट मध्ये अमली पदार्थ असल्याचे सापडले.
कर्जत कल्याण राज्य मार्गावर येत असलेल्या कोषाने येथील सीएनजी महानगर पेट्रोल पंपासमोर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला होता. यामधे दोन मोटरसायकल स्वरांमध्ये आपापसात भांडण झाल्याने येथे नागरिकांची गर्दी जमली तर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार समीर भोईर आणि अन्य पोलीस साथीदार देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान गर्दीच्या ठिकाणाहून एक मोटरसायकल स्वार पळून गेला असता पोलिसांना आलेला संशय यामुळे येथील टी.व्ही.एस अंन्टॉर मोटार सायकल क्र एम.एच.o४ केएन ९६५३ ह्या मोटारसायकलच्या डिकीमध्ये गांजा हा आमली पदार्थ पोलिसांना सापडून आला आहे. २२ वर्षीय तरुण तहुर फारुख शेख हा तरूण आरोपी पोलिसांच्या ताब्यात अडकला आहे. दरम्यान एक तरुण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
मोटारसायकलच्या डिकीमध्ये एकूण- ९२,५००/- रुपये किमतीचा गांजा हा आमली पदार्थ ताबे कब्जात बाळगले स्थितीत पोलिसांना सापडून आल्याने, आरोपी तरुणास अधिक चौकशी साठी कर्जत पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. यावेळी तहुर फारुख शेख हा नेरळ दामात गावाजवळ असणाऱ्या सौशल्या या सोसायटीत राहणारा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्या सोबत असलेला अन्य साथीदार पिंटू असे नाव सांगण्यात आले आहे.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३१०/२०२४ एन.डी.पी.एस. अधिनियम, १९८५, एन.डी.पी.एस. अधिनियम, १९८५ ८(सी), २०(बी)(२) ( ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.