रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील तीन महीलांच्या गळ्यातील सोन्याचे दागीने तसेच बंद घराचे कडी कोयंडा तोडून चोरी करणाऱ्या दोन चोरटयांना ताब्यात घेत त्यांच्याकडून लाखोच्या दागिन्यांसह दुचाकी ताब्यात घेतली आहे. सदर गुन्हयातील २,२६,५००/- रूपये किमतीचा मुद्देमाल मुळ मालक यांना परत केला आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक १२/१२/२०२३ रोजी सकाळी ०६.४० वाजण्याचे सुमारास के. ई. एस. शाळेत आपल्या मुलांना सोडण्यासाठी आलेल्या तीन महीलांचे गळ्यातील सोन्याचे दागीने दोन अज्ञात चोरटयांनी मोटारसायकलवरून पाठीमागुन येवून जबरीने खेचून चोरी करून पसार झाल्या बाबत कर्जत पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं. २९९/२०२३ भा.दं.वि.सं.का. कलम ३९२, ३४. अन्वये दि.१२/१२/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
तसेच दिनांक ०१/०२/२०२४ रोजी दुपारी १२.०० वा ते १६.१५ वाजण्याचे दरम्यान साई गणेश अपार्टमेंट सी विंग रूम नं. १०४, मालवाडी रोड, नानामास्तर नगर, कर्जत येथे राहणारे दिलीप रामचंद्र भोईर यांचे बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडुन घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे एकूण १,७५,०००/- रू किमतीचा मुद्येमाल दिवसा घरफोडी चोरी करून नेले बाबत अज्ञात चोरट्या विरूध्द कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. २४/२०२४ भा.द.वि. कलम ३८०, ४५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहून सदर गुन्हा उघडकीस आणण्या करीता विभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे ,पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी यांनी तयार केलेल्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक पुरावे व गोपनिय बातमीदाराचे मदतीने गुन्हयातील आरोपीत यांना अटक करून आरोपीत यांनी घरफोडी आणि गळ्यातील दागिने चोरी केलेल्या मुद्देमाल पैकी २,२६५,००/- किमतीचे सोन्याचे दागीने व गुन्हा करणेसाठी वापरलेली एक हिरो होंडा कंपनीची पेंशन प्रो मॉडेलची मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे.
सदर दोन्ही गुन्हयातील हस्तगत करण्यात आलेला एकूण २,२६,५००/- रूपये किमतीचा मुहद्येमाल न्यायालयाचे आदेशाने मुळ मालक यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.