कर्जत : पाली भूतीवली धरणात आढळला मृतदेह, अपघात कि घातपात…?

body1
कर्जत ( गणेश पवार ) : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिकसळ येथील पाली भूतीवली धरणात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी आढळला. याबाबत माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. मात्र मृतदेहाची ओळख पटली नव्हती त्यामुळे अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करत नेरळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्याने २४ तासांच्या आत सदर मृतदेहाची ओळख पटवण्यात नेरळ पोलिसांना यास आले आहे.
 कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. पाली भूतीवली डॅमचे पाण्यात बडुन मयत होवुन एका पुरुषाचे प्रेत डॅमचे पूर्व बाजुच्या किना-या लगत पाण्यात तरंगत असतांना मिळुन आले. याबाबतची माहिती पोलीस पाटील प्रदीप गायकर यांनी नेरळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मृतदेहाला बाहेर काढले आहे.
त्यावेळी अनोळखी पुरुष वय- ३० ते ३६ वर्षे अंदाजे, उंची ५ फुट २ इंच अंगाने मजबूत, केस काळे व वाढलेली, नाकातून फेस व पाणी येत असुन अंगात सफेद रंगाचा फुल बाहयाचा शर्ट त्याचे कॉलरचे आतील बाजुस APSARA स्टीकर असुन असुन नेसुस खाकी रंगाची जिन्स पँट त्याचे आत LEADER कंपनीची अंडरविअर, सफेद रंगाची यँडो बनीयन, उजवे हातात स्टीलचा कडा असे मृतदेहाचे वर्णन मिळून आले.
मात्र त्यात मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून नेरळ पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. तेव्हा अंबरनाथ पोलीस ठाणे येथे अशाच वर्णनाचा एक पुरुष बेपत्ता असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली.
अंबरनाथ पोलीस ठाणे येथे मिसिंग रजिस्टर नंबर १२६/२०२३ नोंद आहे. यातील मयत याचे नाव अनिकेत शैलेंद्र पांडे वय २१ वर्षे, रा. फुलेनगर, अंबरनाथ पश्चिम असे असून तो दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता गुरुनानक कॉलेज, सायन मुंबई येथे बीएससी आयटी चे निकालपत्र आणण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा पर्यंत घरातील लोकांचे संपर्कात होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही तर त्याचा फोनही बंद आला त्यामुळे नातेवाईकांनी अंबरनाथ पोलीस ठाणे येथे धाव घेत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
तेव्हा आता त्याची सख्खी बहिण अंकिता शैलेंद्र पांडे वय २५ वर्षे हिने व त्यांचे नातेवाईक तसेच शेजारी यांनी मयतास ओळखले आहे.             अंबरनाथ येथील शेलेंद्र पांडे हा इसम २ ऑगस्ट रोजी सायंकाळनंतर आपल्या कुटुंबाच्या संपर्काच्या बाहेर गेला तो थेट त्याचा मृतदेह ३ ऑगस्ट रोजी दुपारी पाली भूतीवली धरणात मिळवून आला. तेव्हा अशा गुढरित्या झालेल्या या मृत्यूबाबत नेरळ पोलिसांनी तपास सुरु केला असून हा मृत्यू नक्की अपघात कि घातपात यादिशेने देखील तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading